शेती मालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231124-WA0062-1024x472.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231124-WA0062-1024x472.jpg)
कालिदास आपेट यांची मागणी
शेती मालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात ना. नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, इंडिया मध्ये इंडिया मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांनाच मागील ७५ वर्षात केंद्र शासनाने राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सुमारे ४ लाखांहून अधिक शेतक-यांनी आत्महत्या करुन मृत्युला कवटाळले आहे. तथाकथीत पुरोगामी महाराष्ट्रात दररोज सरासरी १५ ते २० शेतकरी मत्यूला कवटाळत आहेत. भारतावर लागलेला हा शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आत्महत्यांचा कलंक पुसणे ही केंद्र शासनाची जबाबदारी आहे.
तरी केंद्र शासनाने शेत मालावरील निर्यातबंदी कायमची बंद करावी, बियाणे, रासायनिक खते, कीड आणि तणनाशकाचे जागतिक तंत्रज्ञान (बीएम) वापरण्याची परवानगी द्यावी, दोन कारखाने आणि इथेनॉल कारखान्यामधील २५ किमी. हवाई अंतराची अट तातडीने रद्द करण्यात यावी, वण्य जीव प्राणी संरक्षण कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, रघुनाथ दादा व इतरांच्या स्वाक्ष-या आहेत.