महाराष्ट्र

शिवसेना कार्यकर्ते अक्षय भुमकर याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

अंबाजोगाई येथील युवा सेनेचे तालुकाप्रमुख अक्षय भुमकर याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अक्षय कुमार यांचे वर येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षय भुमकर यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे.
अंबाजोगाई येथील युवा शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय भुमकर याने काल रात्री दहा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समजते. ही बाब मित्रांच्या लक्षात येताच त्यास तातडीने येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांचेवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी सांगितले.


या संदर्भात अक्षय भुमकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना एक निवेदन लिहीले असून या निवेदनात त्याने युवासेनेचे विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे असे म्हटले आहे.
बिना तारखेच्या या निवेदनात अक्षय भुमकर याने पुढे असे म्हटले आहे की, मी अक्षय भुमकर युवासेना तालुकाप्रमुख अंबाजोगाई जि बीड. वरील विषयानुसार मी विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी मला गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये, स्वारा ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वाढीव संरक्षण भिंतीचे व फर्निचर चे काम. पिंगळे कन्स्ट्रक्शन कंपनी बीड यांच्या मार्फत ३८ लक्ष रूपयाचे काम ३५.०२ कमी रकमेने निविदा स्वीकृत करून काम करण्यास भाग पाडले असता माझी तयारी नसताना देखील मला काम करण्यास भाग पाडले कारण हे काम स्वीकारले नसते तर सदरील १ पिंगळे कन्स्ट्रक्शन कंपनी बीड हि तीन वर्षांसाठी ब्लॉक लिस्ट मधे जात होती.

म्हणून आम्ही आग्रह खातर काम करण्याची तयारी दाखवली. सदरील काम करण्याची माझी परिस्थीती नसताना हि मि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असुन तरी देखील मी सहकारी भागीदारीत हे काम करण्यास तयार झालो. सदरील काम पुर्ण करण्या करीता मी व माझे या कामातील भागीदार आम्ही सदरील कामाचे सामान दुकानातून काही नगदी खरेदी केले तर काही उधारी, आणी इतर पैसे हे व्यवहारीक पातळीवर हात उसणे व व्याजाने काढून काम पुर्ण केले असता प्रथम बिलाच्या ७लाख रूपयाच्या बीलाच्या रक्कमेतील ४लाख ९ हजार रूपये मला त्यांनी दिले व नंतरच्या अंतीम बीलाच्या २१ लाख रूपयाच्या रक्कमेतील पैसे कन्स्ट्रक्शन कंपनी च्या बँक खात्यात १४ नोव्हेंबर रोजी २१ लाख ३७९०० रूपये जम होऊन १ महिना उलटून जात असुन देखील मला त्यातील १ रूपया ही परत विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी दिला नसून मी सतत अंबाजोगाई ते बीड येथे दुचाकीवरून आठ दिवस प्रवास करून दररोज पैशा करीता त्यांच्या कडे जाऊन मागणी केली असता एक हि दिवस भेट न घेता उडवा उडवीची भामटी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली व आजायगत पैसे दिले नाहीत संबंधित सर्व विषय विपुल पिंगळे यांचे वडील माझे राजकीय गुरुवर्य शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बीड बाळासाहेब पिंगळे सर यांना सांगीतला असता मला तेथुन हि प्रतिसाद मिळाला नाही. विपुल पिंगळे हे माझे फोन कॉल घेत नाहीत. नंबर माझा ब्लॉक लिस्ट मधे टाकून ठेवला असुन मेसेज चा हि रिप्लाय देत नसुन ज्यांचे ज्यांचे मी उसने व्याजाने पैसे घेतले आहेत व ज्यांच्या कडुन मी उधारीने माल घेतलेला आहे ते सर्वजण माझ्या घरी बसून आहेत, मला ते पैशा करीता घेऊन जात आहेत हा फक्त मला विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी दिलेल्या त्रासामुळे मी व माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन होत नसुन मी विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या मुळे आत्महत्या करणार आहे कारण आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसुन मी लोकांचे पैसे परत करू शकत नाही. ना मला ना माझ्या कुटुंबाला शेती आहे ना सरकारी नौकरी मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने माझी विपुल पिंगळे यांनी फसवणूक केली आहे हि बाब काही बीड जिल्ह्यातील व पक्षातील अनेक पदाधिकार्यांना समजली असता आशाच प्रकारच्या अनेक पदाधिकार्यां सोबत फसवणूक विपुल पिंगळेंनी केलेल्या प्रकरणाच्या अनेक बाबी निदर्शनास आल्या असून या मुळे मी येत्या ४ दिवसात १३-१२-२०२२ पर्यंत मला माझे सर्वच पैसे परत केले नाहीतर मी आत्महत्या करणार असुन मला आत्महत्या करण्यास विपुल पिंगळे यांनी प्रवृत्त केले असल्याने मी आत्महत्या केल्यास याला जबाबदार युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे हेच जबाबदार राहणार असुन माझ्या पश्चात माझे आई वडील व माझ्या कुटुंबाची झालेल्या अवहेलनेस विपुल पिंगळे जबाबदार असुन घरात मी माझे आई वडील स्वतंत्र राहत आहेत त्यामुळे माझ्या माघारी त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मी आपल्यावर सोडत आहे. साहेब अखेरचा मानाचा कडवट निष्ठावंत शिवसैनिकाचा आपणास जय महाराष्ट्र. असे म्हटले आहे. या निवेदनावर अक्षय भुमकर यांचे नाव असून त्या नावावर स्वाक्षरी केली आहे.

प्रा. सुनील धांडे यांनी घेतली अक्षय ची भेट


दरम्यान अक्षय भुमकर याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त रात्री उशिरा शहरात पसरले. आणि पहाटे पासुन अक्षय भुमकर यांचे चाहत्यांनी रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज बीड चे शिवसेनेचे माजी आमदार प्रा.सुनिल धांडे यांनी अक्षय भुमकर याच्या तब्येतीची विचारपूस करून डॉ.राकेश जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, अंबाजोगाई तालुकाप्रमुख मदन परदेशी, केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, अंबाजोगाई चे माजी उपनगराध्यक्ष अशोक हेडे आदी उपस्थित होते.

या पुर्वी ही केला होता आत्महत्येचा प्रयत्न


दरम्यान अक्षय भुमकर याने यापुर्वी दोन वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.

विपुल पिंगळे यांनी आरोप फेटाळले


या संदर्भात विपुल बाळासाहेब पिंगळे यांचेशी पत्रकारांनी संवाद साधला असता निवेदनात करण्यात आलेल्या दावे खोडून काढले आहेत. अक्षय भुमकर यास आपण केवळ कामाच्या देखरेखीसाठी ठराविक रक्कम ठरवून ठेवले होते. वास्तविक कामाच्या वा कामाच्या बीलाचा त्याचा प्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगितले. अक्षय भुमकर यास ठरवलेल्या रकमेपैकी जवळपास ८० टक्के रक्कम आपण त्यास देवू केली असल्याचे ही विपुल पिंगळे यांनी सांगितले.


▪️आत्महत्येची कारणे वेगळी?


अक्षय भुमकर याच्या आत्महत्येच्या कारणांचा निश्चित शोध आता पोलिस तपासात लागणार आहे. दरम्यान अक्षय भुमकर याने आत्महत्येचा प्रयत्न करुन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना होवून १४ तासांचा कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी अद्याप ही त्यांचा जबाब नोंदवून घेतला नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जबाब नोंदवल्या नंतर तपासाची दिशा निश्चित होईल असे सांगितले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker