मनोरंजन
शिवशाही बस ने वृध्द इसमाला चिरडल्यामुळे दोन्ही पाय झाले निकामी


अंबाजोगाई शहरातील -हदयद्रावक घटना
अंबाजोगाई बस स्थानकासमोर रस्त्यावरुन पायी चालणा-या वृध्द इसमाच्या दोन्ही पायांवरुन शिवशाही बस गेल्याने सदरील इसमाचा दोन्ही पाय निकामी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
प्राप्त माहिती नुसार, अंबाजोगाई शहरात बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्या सहा पदरी करणाचे काम सध्या वेगात सुरु आहे. त्यातच रुंद झालेला बसस्थानका समोरील या रस्त्यावर फळ विक्री करणारे हात गाड्यांनी, ऍटो चालकांनी हा रस्ता अर्धाधिक व्यापून टाकला असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. बस स्थानकात जाणाऱ्या आणि बस स्थानकातुन बाहेर निघणा-या गाड्यांच्या ड्रायव्हरना मोठी कसरत करावी लागत आहे.


त्यातच आज २० नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास लातूर – परळी शिवशाही बस क्रमांक (MH 09 EM9971) अंबाजोगाई बस स्थानकात जात असताना अपघात अचानक या रस्त्यावरुन पायी चालणा-या वृध्द इसमाच्या दोन्ही पायांवरुन ही बस गेली. सदरील बसची चाके वृद्ध इसमाच्या पायांवरुन गेली असल्यामुळे या अपघातात सदरील इसमाचे दोन्ही पाय चिरडल्या गेल्याची घटना घडली.

