शिशिर बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230210-WA0215-841x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230210-WA0215-841x1024.jpg)
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचीव शिशिर बेलुर्गीकर यांचे प्रदीर्घ आजाराने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. उध्या ११ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे कुटुंबीयांनी दिली.
योगेश्वरी शिक्षण संस्थेत सहशिक्षक म्हणून रुजू झालेले शिशिर बेलुर्गीकर सेवा निवृत्ती पर्यंतचा काळ पर्यवेक्षक ते उपमुख्यापक पदापर्यंत ची पदोन्नती घेत पुर्ण केला. सेवा निवृत्ती नंतर योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाली. सध्या ते सहसचीव म्हणून या कार्यकारिणीत काम पहात होते.
शिशिर बेलुर्गीकर हे मागील काही वर्षांपासून आजारी होते. पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार चालू होते. अलिकडेच त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारांना त्यांची प्रकृती प्रतिसाद देत नसल्याने त्यांना घरी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आज १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी रुग्णालयातुन घरी आणल्यानंतर लगेचच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उद्या ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचे पार्थिवावर दासोपंत स्मशानभूमी परीसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांचे कुटुंबीयांनी दिली आहे.