शासनाच्या प्रस्तावानंतर शत्रुघ्न काशीद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231028_142212-300x274.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231028_142212-300x274.jpg)
२५ लाखांच्या मदतीचा व एका व्यक्तीस शासकीय नोकरीच्या प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
मराठा आरक्षणासाठी गिरवली गावात पाण्याच्या टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या शत्रुघ्न अनउरथ काशीद यांच्या कुटुंबीयांला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत करण्यात यावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्यात यावा, राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेचा कुटुंबीतील इतर सदस्यांना लाभ देण्यात येईल असा प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या वतीने मयत काशीद यांच्या समोर ठेवून त्याचे पार्थिव ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात यावा अशी विनंती शासनाच्या वतीने तहसीलदार तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी विलास तरंगे यांनी आंदोलन स्थळी येवून केली.
ऍड. माधव जाधव यांचे २९ ऑक्टोबर पासून बसणार बेमुदत उपोषणाला
▪️ऍड. माधव जाधव यांचे २९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणया मागण्यांच्या प्रस्तावावर बोलतांना ऍड. माधव जाधव यांनी शासनाच्या या प्रस्तावावर काशीद यांच्या कुटुंबीयांनी आणि गिरवली ग्रामस्थांनी निर्णय घ्यावा असे जाहीर करीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला स्थगित करण्यासाठी २९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/image_editor_output_image899785948-1698494386135-268x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/image_editor_output_image899785948-1698494386135-268x300.jpg)
प्रस्तावानंतर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबातीय व ग्रामस्थांची सहमती
शासनाच्या या प्रस्तावावर विचार करीत गिरवली ग्रामस्थ आणि काशीद कुटुंबातील सदस्यांनी विचार करून शत्रुघ्न काशीद यांचे पार्थिव ताब्यात घेऊन गिरवली येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गिरवली ग्रामस्थ व काशीद कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कालिदास आपटे यांनी जाहीर केला. व शत्रुघ्न काशीद यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने शत्रुघ्न काशीद यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.