शांत, संयमी आणि प्रवाही पत्रकारीतेतस मनस्वी शुभेच्छा…!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084921-300x254.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084921-300x254.jpg)
छोट्या -मोठ्या वर्तमान पत्रातुन लोकमत सारख्या मोठ्या दैनिकात पत्रकारीतेत स्थिरस्थावर होत असतांनाच १९९० घ्या सुरुवातीच्या काळापासून मी संतोष मानुरकर यांना ओळखतो. बीड जिल्ह्यातील प्रमुख वर्तमानपत्र असलेल्या झुंजार नेता या दैनिकात संतोष मानुरकर हे उपसंपादक म्हणून काम पहायचे तेंव्हा पासून!
संतोष मानुरकर यांची पत्कारीता सुरुवातीपासूनच शांत, संयमी आणि नितळ प्रवाही पाण्यासारखी राहीली आहे. सुरुवातीपासूनची पत्रकारीतेतील आपली ही ओळख न मिटू देता ती संतोष यांनी अधिक ठळक केली हे विशेष!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084750-1024x869.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084750-1024x869.jpg)
बीड जिल्हा दैनिकात काम करीत असताना संतोष यांनी जिल्हा पातळीवर वेगवेगळे विषय अत्यंत संयमपणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध शासकीय, सामाजिक, राजकीय विषयावरील संतोष यांनी केलेले लिखाण केवळ वाचनीयच नाही तर चिंतनीय ही राहीले आहे. संतोष यांना अत्यंत कमी वयात जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली याचा मला तेंव्हा खरोखरच हेवा वाटायचा! जिल्हा दैनिकात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीच सोनं करीत संतोष यांनी आपल्या नितळ प्रवाही पत्रकारीतेच्या माध्यमातुन जिल्हा पातळीवरील शासकीय अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या सोबत तितकेच नितळ संबंध निर्माण केले, ते जोपासले आणि वाढवले ही! सहसा पत्रकारीतेत असे होत नाही. अधिकारी-राजकारणी आपल्या पदावर कार्यरत रहातात तो पर्यंतच ते पत्रकारांसोबत चे संबंध जोपासतात फुलवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. पण संतोष यांनी अधिकारी आणि राजकारणी यांचे संबंध कायम जोपासले आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084735-1024x766.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084735-1024x766.jpg)
संतोष यांनी जिल्हा पातळीवर काम करीत असताना सर्व पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी बीड जिल्हा पत्रकार संघाचे प्रभावी नेतृत्व केले. या पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रतिवर्षी राज्यातील एका महनीय पत्रकारांना पुरस्कार देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरवण्याचा दिमाखदार कार्यक्रम अनेक वर्षे राबवून त्यांनी राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला.
संतोष यांची झुंजार नेता या दैनिकातील कार्यकीर्द अत्यंत देखणी आणि प्रभावी राहिली. साधारणपणे सलग तीन दशके एक हाती कारभार करीत संतोष यांनी या दैनिकाचे काम अत्यंत यशस्वीपणे सांभाळले आणि दैनिकातुन सन्मानाने बाहेर निघाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084835-1024x709.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230120_084835-1024x709.jpg)
झुंजार नेता या दैनिकातुन बाहेर पडताच त्यांनी स्वतंत्र पणे “प्रभाकर” हे साप्ताहिक सुरु केले. साप्ताहिकाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अत्यंत संयतपणे “दैनिक दिव्य लोकप्रभा” या दैनिकाची आखणी केली. दोन वर्षांपूर्वी १ जानेवारीच्या रोजी “दिव्य लोकप्रभा ” हे दैनिक त्यांनी सुरु केले. बीड, लातुर, उस्मानाबाद, नांदेड, जालना या जिल्ह्यात त्यांनी कुशल आणि सक्षम वार्ताहरांना सोबत घेवून या दैनिकाची वाटचाल सुरू केली. अल्पावधीतच “दिव्य लोकप्रभा” या दैनिकाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात संतोष यांना यश ही आले. आज दिव्य लोकप्रभा हे दैनिक मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, आणि या दैनिकाचा एक छोटा हिस्सा आहे याचा सार्थ अभिमान ही आहे!
संतोष यांचा आज वाढदिवस! यावर्षी पासुन वाढदिवस आणि “दिव्य लोकप्रभा” चा वर्धापण दिन संयुक्त पुणे साजरा करण्याचा निर्णय संतोष मानुरकर यांनी आणि “दिव्य लोकप्रभा” च्या टीम ने घेतला आहे. संतोष यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांनी सुरु केलेल्या “दिव्य लोकप्रभा” च्या वर्धापन दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा! संतोष यांनी सुरु केलेली पत्रकारीता यापुढे ही नितळ प्रवाही पाण्यासारखी खळखळत वाहती राहो ही मनस्वी शुभेच्छा!!
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा!