शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य
एम. बी. पाटील यांनी "दगाबाज" पुस्तकात केले पवारांवर विविध आरोप


शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय या गंभीर आरोपासह अनेक आरोप भिवंडी येथील लेखक एम. बी. पाटील यांनी आपल्या “दगाबाज” पुस्तकात केले शरद पवार यांचेवर केले आहेत. या पुस्तकात एम. बी. पाटील यांनी शरद पवार यांच्या गैरकारनाम्यांचा पाढा वाचला आहे. ज्येष्ठ राजकारणी आणि राजकीय चाणाक्ष म्हणून महाराष्ट्रात गेली साठ वर्षे आपला राजकीय दबदबा कायम ठेवणा-या शरद पवार यांच्यावर प्रखर टीका करणारे आणि त्यांच्या गैरकारनाम्यांची पोलखोल करणारे “दगाबाज” हे ४५८ पानांचे पुस्तक भिवंडी येथील एम. बी. पाटील यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लिहीले असून आदिती प्रकाशन प्रकाशित केले आहे.
“दगाबाज” या पुस्तकाचे लेखक एम. बी. पाटील यांनी मुंबई आऊटलुक या चॅनल चे संपादक संजय मलमे यांना दिलेल्या मुलाखतीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासुन सलग २० वर्षे शरद पवार यांच्या सोबत काम केला असल्याचा दावा केला असून या पुस्तकातील मजकुराविषयी आपण सर्व माहिती घेऊन व सर्व संदर्भ पडताळून हे पुस्तक लिहिले असल्याचे सांगितले आहे.
४५८ पानांच्या या पुस्तकाच्या अंतरंगात एम. बी. पाटील यांनी एकुण ५८ प्रकरणे (भाग) लिहिली आहेत. यामध्ये यामध्ये शरद पवार यांचे शिक्षण व कौटुंबिक पार्श्वभूमी, राजकीय उदय, यशवंतराव व “पुलोद” सत्तेचा शॉर्टकट, आरक्षणासंदर्भात त्यांची भुमिका, गुन्हेगारांशी असलेले संबंध, सहकार क्षेत्रातील दरोडे, मास्टरमाईंड घोटाळे, बॅरिस्टर अ. र. अंतुले चा घेतलेला राजकीय बळी, दलीत चळवळ मोडीत काढण्याचा डाव, महाराष्ट्रातील काका-पुतण्यांचा वाद, विविध पक्षांशी असलेले राजकीय संबंध, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बळकावले आदि प्रकरणांमधून शरद पवार यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. या पुस्तकात लेखक एम. बी. पाटील यांनी शरद पवार यांचा थेट संबंध महाराष्ट्रात गाजलेल्या १६ घोटाळ्यांची जोडला आहे. यामध्ये लवासा जमीन घोटाळा, सिंचन घोटाळा, मुंबई तील २८५ भुखंड घोटाळे, जावा यांचा ४२७ कोटींचा भुखंड घोटाळा, सहकारी साखर कारखाने घोटाळा, शिखर बॅंक घोटाळा, विद्या प्रतिष्ठान जमीन घोटाळा, आयपीएल कर सवलत घोटाळा, साखरेचा कृत्रिम दरवाढ घोटाळा, गहु अन्न नागरी पुरवठा घोटाळा, बनावट मुद्रांक घोटाळा, पूंजी स्पेक्ट्रम घोटाळा, ठिबक सिंचन अनुदान घोटाळा, कृषी अनुदान व कर्जमाफी घोटाळ्यांशी संबंध जोडला आहे.
एक प्रगल्भ आणि सुसंस्कारी राजकारणी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या चाणाक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील १० का-पुतण्यांमध्ये वाद निर्माण केला यांचे विस्तृत विवेचन या पुस्तकात एम. बी. पाटील यांनी केले आहे. यामध्ये उदयनराजे आणि अभयसिंहराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, अशोकराव आणि संभाजीराव पाटील निलंगेकर, गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि अवधुत तटकरे, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ, अनिल देशमुख आणि आशीष देशमुख, बदामराव पंडीत आणि अमरसिंह पंडित, शरद पवार आणि अजित पवार या काका पुण्यामधील राजकीय संघर्षाचा उहापोह केला आहे.
पुलोद आघाडीच्या यशानंतर स्वतः ला मोठं सिध्द करण्यासाठी शरद पवार यांनी पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे राजकीय वजन व महत्त्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केले असा आरोपही या पुस्तकात करण्यात आला आहे.
४५८ पानांच्या या पुस्तकाच्या पाठीमागील पानावर लेखक एम. बी. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकुरात लेखक एम.बी. पाटील यांनी व्यक्त केलेले मत पुढील प्रमाणे आहे. “शरद पवारा यांची नेहमीच “आयत्या बिळावर नागोबा”! अशी भूमिका राहीली असून त्यांची ६२ वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्ट्राचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना या स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाहीत. ही वास्तवता आणि तेवढेच मोठे दुर्दैव! सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा हा नवा मंत्र त्यांनी राज्य व देशाच्या राजकीय पटलावर आणला. ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत. अभ्यासू नेते ही त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा आहे. वास्तविक जीवनात ते गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी राजकारणी आहेत. जर खरेच च ते अभ्यासू नेते असते तर राजकारण, समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण अपेक्षित होते, अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या. शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय. अशी त्यांची समर्पक व्याख्या करता येईल.”
▪ महाराष्ट्रात मुद्रक, प्रकाशक भेटलाच नाही!
“दगाबाज” हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉल वर विक्री साठी उपलब्ध नाही. हे पुस्तक प्रकाशित आणि मुद्रित करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील अनेक प्रकाशक, मुद्रकांना भेटुन विनंत्या केल्या. मात्र एकाही मुद्रक, प्रकाशकाने हे पुस्तक छापण्याची वा प्रकाशित करण्याची हिंमत दाखवली नाही. असे लेखक एम. बी. पाटील यांनी आपल्या “मुंबई आऊटलुक” ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
▪ वेबसाइटवरच पुस्तकाची विक्री
हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मुद्रक प्रकाशक महाराष्ट्रात न मिळाल्याने लेखक एम. बी. पाटील यांनी “आदिती प्रकाशन” ची निर्मिती करुन हे पुस्तक नवी दिल्ली येथील जैन ऑफसेट प्रिंटर्स येथे छापून प्रकाशित केले. या पुस्तकाची विक्री WWW.aditiprakashan.com या वेबसाईटवर होत असून येथेच बुकिंग करा व पुस्तक घरपोच मिळवा. अशी विनंती लेखक एम. बी. पाटील यांनी केली आहे.
@: सुदर्शन रापतवार/अंबाजोगाई