राष्ट्रीय

शरद पवार दाखल झाले रुग्णालयातुन थेट शिर्डीत; कार्यकर्त्यांना मिळाले नवे बळ!

गेली तचार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळताच थेट शिर्डीत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीराचे सहभाग नोंदवला. शरद पवारांची ही उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवे बळ देवून गेली.

आजच्या शिबिरातून एक चांगला संदेश राज्यात जात आहे. लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी व्यक्त केला.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवार यांनी तब्बेतीमुळे थोडक्यात मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

या शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता पुढे युवक, युवती, महिला, सर्व सेलचे घटक काम करत आहेत त्यांचेही स्वतंत्र शिबीर आयोजित करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला – दिला आहे त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker