शब्दवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेच्या वतीने जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त, ‘जनसंपर्कतज्ज्ञ प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्काराचे पाहिले मानकरी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, (अंबाजोगाई) यांची निवड करण्यात आली आहे.
११ हजार रोख, मानचिन्ह असे स्वरूप
शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या वतीने या वर्षापासून सदर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. अकरा हजार रुपये रोख रक्कम, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१८ में रोजी होणार वितरण
पुरस्कार वितरणा दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनु हिल, संभाजीनगर येथे होणार आहे.
पुरस्काराचे पहीलेच वर्षे
पुरस्काराचे पहिलंच वर्ष असून यापुढेही लोकपत्रकारिता करणार्या पत्रकारांचा सन्मान करून या पुरस्काराचे मूल्य जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे शब्दवेधचे वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.