वैद्यनाथ ज्योतिर्लिंगचा प्रसाद योजनेत समावेशाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार;पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230314-WA0239-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230314-WA0239-300x225.jpg)
पंकजा मुंडे यांनी केले स्वागत
केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी “प्रसाद” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याच्या पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या घोषणेचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230314-WA0240-300x169.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230314-WA0240-300x169.jpg)
केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी सुरू केलेल्या प्रसाद योजनेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करून या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच सभागृहात सांगितले होते. दरम्यान आम्ही सातत्याने करत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
••••