विशेष सहाय्य अनुदानासाठी निधी उपलब्ध करून द्या; आ. नमिता मुंदडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image2056876541-1683112408600.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image2056876541-1683112408600.jpg)
आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
बीड जिल्ह्यात विशेष सहाय योजनांना एप्रिल २०२३ ते जून २०२३ साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात खालील विशेष सहाय योजनांना मागील वर्षात वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने लाभार्थी दहा ते अकरा महिने मानधनापासून वंचित राहिले होते. खालील योजनेतील लाभार्थी यांना मिळणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असू सदर अनुदानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असून त्यांच्यासाठी तो मोठा आधार आहे. त्यामुळे सदरचे अनुदान त्यांना वेळेवर मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे एप्रिल २०२३ ते जून २०२३ साठी त्वरित निधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/shrawan-bal-yojana-1024x674.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/shrawan-bal-yojana-1024x674.jpg)
त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना (सर्वसाधारण लाभार्थी), संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जाती लाभार्थी), संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जमाती लाभार्थी), श्रावणबाळ सेवा राज्य निवृतीवेतन योजना (अनु. जमाती लाभार्थी), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृतीवेतन योजना (सर्वसाधारण लाभार्थी), श्रावणबाळ सेवा राज्य निवृतीवेतन योजना (अनु.जाती लाभार्थी), इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या विशेष सहाय योजनांसाठी एप्रिल २०२३ ते जून २०२३ साठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.