महाराष्ट्र

विलास आठवले यांना राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार यंदा ‘न्यूज – स्टेट, महाराष्ट्र – गोवा’ चे विलास आठवले (मुंबई) यांना जाहीर झाला असून दि. ३१ जानेवारी मंगळवार २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा देखील याच दिवशी होणार असल्याची माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय वृत्तपत्र सृष्टीत अगणित योगदान आहे. त्यांच्या प्रखर व तेजस्वी लेखणीने भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. अशा महामानवाने ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र ३१ जानेवारी १९२० रोजी उपेक्षित, शोषित, पिडीतांसाठी समर्पित केले. त्या निमित्ताने अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ३१ जानेवारीला दरवर्षी ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन करण्यात येते.

‘मूकनायक’ दिनानिमित्त देण्यात येणारा ‘मूकनायक’ पुरस्कार यंदा ‘न्यूज – स्टेट, महाराष्ट्र – गोवा’ चे विलास आठवले (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. विलास आठवले यांनी प्रिंट मिडियात लोकमत, सांज दिनांक, आज दिनांक, दैनिक जनसत्ता ( हिंदी) तर इलेक्ट्रॉनिक मिडियात मिड – डे टिव्ही, डीडी हिंदी – सह्याद्री, स्टार – माझा, टीव्ही – ९ महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, मॅक्स महाराष्ट्र यात महत्वाच्या पदावर काम केले आहे. सध्या ते ‘न्यूज – स्टेट, महाराष्ट्र – गोवा’ मध्ये कार्यरत आहेत. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मूकनायक’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचा ही होणार गौरव!

ओंकार रापतवार यांच्या सह इतर मान्यवरांचाही होणार सन्मान!

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रमुख अतिथी म्हणून ‘स्वाराती’ चे‌ अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमातचं ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह (ISCKRS) सर्जन यांच्या तर्फे ‘आउट्स्टैन्डिंग टिचर अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल तसेच विविध परिक्षेत, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. यामध्ये सर नागेश जोंधळे, डॉ. राहुल धाकडे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, चित्रा पाटील, चैत्राली हजारे, ओंकार रापतवार, डॉ. वैष्णवी गायकवाड, राजू वाघमारे, बालशाहीर अविष्कार ऐडके, गौरी बर्दापूरकर, रिध्दीमा सांगळे, सृष्टी शेटे, सुनिल होळंबे, विश्वराज देशमुख, शैलेष पारसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन !

‘मूकनायक’ दिनाचा हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात ३१ जानेवारीला मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव गणेश जाधव, संघाचे ज्येष्ठ सदस्य जगन सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हतागळे, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, प्रवीण कुरकूट, रविंद्र अरसुडे, दत्ता वालेकर, रतन मोती यांच्यासह आदी सदस्यांनी केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker