विलासराव देशमुख सभागृहातील खुर्च्यां तात्काळ दुरुस्ती करा;आ.मुंदडा


अंबाजोगाई नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील तुटलेल्या खुर्च्या आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला असून सदरील तुटलेल्या खुर्च्यांची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी अशी सुचेना आ. नमिता मुंदडा यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना केली आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या एका निवेदनात आ. नमिता मुंदडा यांनी पुढे म्हटले आहे की, अंबाजोगाई नगर परिषदे मध्ये मा. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नावाने असलेल्या सभाग्रहातील २५% खुर्च्या नादुरुस्त आहेत. नादुरुस्त खुर्च्यामुळे कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांना उभे राहून कार्यक्रम पाहवा लागतो. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
तरी सदर सभागृह नगर परिषद भाड्याने देतो सादर ठिकाणी सतत कार्यक्रम होतात. त्यामुळे सदर सभागृहाच्या खुर्च्या तातडीने नवीन बसवाव्यात किंवा दुरुस्त करण्यात याव्यात. अशी सुचेना आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.