विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेल्या एका रीक्त जागे पैकी विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करुन ठेवा अशा सुचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत.
उद्या १७ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत संजय दौंड यांना संधी मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधान परीषदेची एक रीक्त जागा असून या जागेसाठी संजय दौंड, मुंबई येथील जिशान सिध्दिकी आणि पुणे येथील उमेष पाटील या तिघांना ही उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिले आहेत. या तीन उमेदवारांपैकी उन्मेष पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया केल्याची चर्चा आहे. मुंबई येथील जिशान सिद्दीकी यांना वडिलांच्या सहानुभूतीचा आधार आहे तर संजय दौंड यांचे गेल्या ४० वर्षातील त्यांनी केलेले पॉझिटिव्ह पॉलिटिक्स त्यांच्या पाठिशी आहे. यासर्व पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार निश्चित करणार आहे.
बीड जिल्ह्याला स्वच्छ चारित्र्याच्या लोकप्रतिनिधीची गरज
महाराष्ट्रातील आणि एकुणच बीड जिल्ह्यातील राजकीय मलीन झालेली प्रतिमा बदलण्यासाठी स्वच्छ कसल्याही प्रकारचा कलंक नसलेल्या लोकप्रतिनिधी ची गरज आहे. संजय दौंड यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने संधी उपलब्ध करून दिली तर बीड जिल्ह्याचे मलीन झालेले चित्र काही प्रमाणात का होईना थोडं बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल असे जाणकारांचे मत आहे.
उद्या १७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संजय दौंड यांना संधी देतो का नाही हे उद्दा सकाळी ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
कोण आहेत संजय दौंड…?
संजय पंडीतराव दौंड हे गेली ४० वर्षांपासून राजकारणात सक्रीय असले तरी ते एक अतिशय संवेदनशील माणूस आणि प्रगतीशील शेतकरी आहेत. सामान्य लोकांच्या मतदतीला धावणे, अन्यायाविरुद्ध उभे टाकणे आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून अनेकांचे आयुष्य वाढवणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. राजकारणात येण्याच्या पुर्वीपासून त्यांना राजकारणात सक्रीय ठेवण्यासाठी त्यांच्या या जमेच्या बाजूंचा मोठा वाटा आहे.
………….
१४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विधान परीषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले संजय दौंड हे नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.
संजय दौंड याचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातील दौंडवाडी या छोट्याशा खेडेगावी झाला. वडीलांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय असला तरी संजय दौंड यांचे वडील पंडीतराव दौंड यांनी कायद्दाची पदवी घेतली असल्यामुळे ते शेती व्यवसाय करीत वकीली व्यवसायाकडे वळले.
पुर्वीच्या रेणापुर मतदारसंघातील तत्कालीन विद्दमान आ. रघुनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या रीक्त झालेल्या जागी काँग्रेस पक्षाने अँड. पंडीतराव दौंड यांना उमेदवारी दिली आणि ते या मतदार संघातुन विजयी होवून वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात मंत्री ही झाले.
विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय
संजय दौंड यांचे यावेळी उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षण चालु होते. वडिलांना राजकारणात काम करण्याची संधी मिळाली असल्यामुळे संजय दौंड ही विद्यार्थी दशेपासुनच राजकारणात सक्रीय झाले. महाविद्यालयात एनएसयुआय च्या माध्यमातून काम करीत त्यांनी विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले.
परळी विधान सभा मतदार संघात १९९२ पासुन आजपर्यंत ते सतत कार्यरत आहेत. बीएसस्सी ही पदवी पुर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम १९९२ साली घाटनांदुर जि.प. मतदार संघातुन निवडणूक लढवली आणि १९९२-१९९७ अशी सलग पाच या वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे १९९७-२००२ या पाच वर्षात धर्मापुरी या जि.प. मतदारसंघातुन त्यांना निवडणुक लढवावी लागली. याही निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे पट्टीडगाव जि.प. मतदार संघातुन २०१०-१२ या कालावधीत त्यांनी नेतृत्व केले. २०१२-२०१७ या कालावधीत त्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
१९९२ लाख मिळाली जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी
१९९२ पासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या संजय दौंड यांनी पत्नी सौ. आशा संजय दौंड यांच्या माध्यमातून ही जिल्हा परीषदेच्या राजकारणातील आपली पकड कायम ठेवली. सलग दहा वर्षे पत्नी सौ. आशा दौंड यांना
जि प. सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळताच २०१४ ते २०१७ मधील अडीच वर्षाचा कालावधीत त्यांनी जि. प. चे उपाध्यक्ष म्हणून ही काम करण्याची संधी मिळवून दिली.
जानेवारी २०२० ला विधान परिषदेवर निवड
१४ जानेवारी २०२० रोजी विधान परीषदेतील विद्यमान आ. धनंजय मुंडे हे विधान सभेच्या निवडणुकीत विजयी झाले आणि विधान परीषदेतील आ. धनंजय मुंडे यांच्या उर्वरित कालावधीसाठी संजय दौंड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधान परीषदेसाठी नियुक्ती झाली.
विधान परीषदेतील आपला अडीच वर्षांचा काळ त्यांनी गाजवला. याच काळात कोवीड ची लाट आल्यामुळे त्यांनी आपला सर्वाधिक काळ रुग्णसेवेत आणि रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यासाठी घालवला. याच कालावधीत झालेल्या अधिवेशन कालावधीत त्यांनी विधान सभे च्या पाय-यावर चक्क शिरसासन करुन “या सरकारचे करायचे काय? खाली मुंडकं वर पाय” हा नारा दिला.
पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता?
आता विधान परीषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रीक्त जागेवर पुन्हा एकदा संजय दौंड यांचे नांव चर्चेत आले आहे. संजय दौंड मुंबई येथील जिशान सिध्दिकी आणि पुणे येथील उमेष पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया पुर्ण करुन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उद्या १७ मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी ११ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुन्हा एकदा संजय दौंड यांना विधान परीषदेवर संधी मिळेल का नाही हे चित्र स्पष्ट होईल.
संजय दौंड यांना विधान परीषदेसाठी परत एकदा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळते का नाही हे काही तासांतच आपणास समजणार आहे. तो पर्यंत वाट पाहू!
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.