ठळक बातम्या
विद्यार्थिनी व महिलांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत करा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220922_192648.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220922_192648.jpg)
अंतरभारतीचे आवाहन
विद्यार्थिनी व महिलांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत करा असे आवाहन आंतरभारती च्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब, तालुकाध्यक्ष दत्ता वालेकर आणखी प्रकल्प संयोजक ज्योती शिंदे यांनी केले आहे.
आंतरभारती च्या वतीने या संदर्भात प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, आपल्या समाजात अशा अनेक मुली आहेत, ज्यांना थोडीशी आर्थिक मदत मिळाली तर त्या छोटासा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात! अडचणीत असलेल्या अनेक महिला छोट्या मदतीमुळे आपला संसार सावरू शकतील. मुलींनी / महिलांनी आपल्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा महिलांचा उद्धार करण्यासाठी काही सरकारी योजना आहेत, हे आपल्याला माहीत आहे. या योजनांचा लाभ कोण घेतो, हेही आपण पाहतो आहोत. सरकारी योजनांना डोळे नसतात म्हणून खरा गरजवंत त्यांना दिसत नाही. खरे गरजवंत वंचित राहतात. तुम्हा आम्हाला खरे गरजवंत माहीत असतात. त्यांना आपण सरकारी योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ती मिळेलच याची खात्री नसते. अशा स्थितीत आपण काय करू शकतो? या सर्व गोष्टींचा विचार करून आंतरभारतीच्या आंबाजोगाई शाखेने एक प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचे नाव आहे “विद्यार्थिनी व महिला साहाय्यताकोष”(विमसाको)
या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र आंबाजोगाई शहर व तालुका. मदत मर्यादा अधिकतम 50 हजार रुपये असून या योजनेचे स्वरूप- एका लाभार्थीला 50 हजारांपर्यंत मदत परतीच्या बोलीवर दिली जाईल. ती त्यांना 3 वर्षाच्या आत परत करावयाची आहे. एका वर्षी १ लाख रुपये दिले जातील. ३ लाख रुपये गोळा झाल्यानंतर ही योजना सुरू केली जाईल.
▪️फक्त 2 हजार रुपये द्या
या प्रकल्पाच्या सहानुभूती दारांनी प्रत्येकी दोन हजार रुपये किमान
देणगी द्यावी. अशा देणगी मधून 3 लाख रुपये जमल्यानंतर कार्यवाही सुरू केली जाईल. तीन वर्षांनी पैसे परत यायला लागतील तेंव्हा तेच पैसे अन्य लाभार्थीला देता येतील.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230201-WA0116-300x294.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230201-WA0116-300x294.jpg)
▪️ महिलाच चालवणार प्रकल्प
हा प्रकल्प आंतरभारतीच्या सभासद असलेल्या अकरा महिलांची टीम चालवणार आहे. म्हणजे महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा प्रकल्प आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230201-WA0117-935x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230201-WA0117-935x1024.jpg)
▪️आवाहन
महिलांना आधार देणारा हा प्रकल्प आहे. त्यास सर्व सुजाण नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन प्रकल्प संयोजक ज्योती राहुल शिंदे 72198 90098,
तालुका अध्यक्ष, आंतरभारती, आंबाजोगाई, दत्ता वालेकर आणि
राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब 8411909909 यांनी केले आहे.