महाराष्ट्र

विकास निधीच्या माध्यमातून मंदिरांचा कायापालट करणा-या आ. नमिता मुंदडा यांना मतदार संघात मिळतोय प्रतिसाद

भाजपा महायुतीच्या केज विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आ. सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी विविध विकास कामांसोबतच या भागातील जनतेची श्रद्धास्थाने असलेल्या विविध देवस्थानांच्या मंदिरांचांही विकास करण्याचे विशेष कार्य केले आहे. यासाठी जवळपास आकरा कोटींचा निधी त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज माध्यमावरून आमदार मुंदडा यांना जनता धन्यवाद देत आहे. मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण केलेल्या विकासकामांमुळे मतदारसंघात सर्वस्तरांतून आ. नमिता मुंदडा यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

समाज माध्यमातून शेयर करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये आमदार मुंदडा समर्थकांनी नमूद केले आहे की, राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर केज मतदार विकासकामांची अगदी रेलचेल झाली आहे. मागील दोन वर्षांत तर या मतदारसंघात विविध ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, विविध शासकीय कार्यालय उभारणी, सार्वजनिक स्मशानभूमी यासाठी मोठा विकासनिधी आणण्यात त्यांना यश आलेले दिसत आहे. केवळ रस्ते लाईट पाणीच नव्हे तर हजारो लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या विविध मठ व मंदिरांच्या विकासाकडे ही त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

वर्षभरात त्यांनी १६ देवस्थानांच्या विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत ११ कोटींच्या आसपासचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. यात प्रामुख्याने पर्यटन विकास निधी अंतर्गत नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानसाठी ७० लाख रूपयांचा कीर्तन मंडप, विडा येथील शिवरामपुरी मठ संस्थान साठी ५० लक्ष रूपयांचा सभामंडप, वरपगाव येथील शिवरामपुरी मठसंस्थानसाठी १ कोटी १० लक्ष रूपयांचा सभामंडप, आडस येथील आडकेश्वर महादेव मंदिरासाठी २५ लक्ष, आडस येथील हनुमान मंदिरासाठी २५ लक्ष, आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी ५० लक्ष रूपये, युसुफवडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी ५० लक्ष रूपये, वाघेबाभूळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी ५० लक्ष रूपये, रामेश्वरवाडी (हंगेवाडी) येथील महादेव मंदिरासाठी २५ लक्ष रूपये, सासुरा येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी २५ लक्ष रूपये, नंदुरघाट येथील तळ्याची आई देवस्थानसाठी ४० लक्ष रूपये, धनेगाव येथील मेसाईदेवी मंदिरासाठी ५० लक्ष, केज येचील भवानी आई मंदिरासाठी २५ लक्ष, केज येथील हजरत ख्वाजा महजबोद्दीन दर्गाहसाठी २५ लक्ष रूपये, दहिफळ वडमाऊली देवस्थानसाठी ५० लक्ष रूपये तर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी २ कोटी रूपये, दहिफळ वहमाऊली येथील देवस्थानासाठी २ कोटी रूपये असा निधी मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता. यातून काही ठिकाणी सभामंडप, किचनशेड, पालखी हॉल, पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरण अशी विविध कामे होणार आहेत.

आ.नमिता मुंदडा यांनी विशेष लक्ष घातल्याने विविध श्रद्धास्थानांचा होणारा कायापालट लक्षवेधी ठरला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याकामी त्यांना ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे मार्गदर्शन व युवा नेते अक्षय मुंदडा यांची भक्कम साथ आणि केज मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद लाभत आहे. आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी विविध विकास कामांसोबतच या भागातील जनतेची श्रद्धास्थाने असलेल्या विविध देवस्थानांच्या मंदिरांचांही विकास करण्याचे विशेष कार्य केले आहे. यासाठी जवळपास आकरा कोटींचा निधी त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज माध्यमावरून आमदार मुंदडा यांना जनता धन्यवाद देत आहे. मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण केलेल्या विकासकामांमुळे मतदारसंघात सर्वस्तरांतून आ. नमिता मुंदडा यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker