दैनिक वार्ता समूहाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दैनिक वार्ता समूहाचा १७ वा वर्धापन दिन सोहळा १५ मार्च २०२५ रोजी सायं. ५ वा. श्री मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न होणार आहे.या निमित्ताने बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र इंजि.भरत केशवराव गित्ते यांचा जाहीर सत्कार यानिमित्ताने आयोजित केला आहे. तर वार्ता समूहाच्या पुरस्काराचे वितरण त्यांच्याच हस्ते होणार आहे.
दैनिक वार्ता समूहाचे या वर्षीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहेत.ज्यामध्ये नगरभूषण पुरस्कार हा उद्योजक लक्ष्मणराव मोरे यांना सद्भावना पुरस्कार हा सतीश बनसोडे यांना तर युवा गौरव पुरस्कार सुजित दिख्खत (ठाकूर) यांना जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण १५ मार्च रोजी सायं. ५ वा.अंबाजोगाई येथील श्री मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमास टोरल इंडिया कंपनीचे मुख्य प्रवर्तक इंजि. भरत केशवराव गित्ते यांच्या यांच्या हस्ते मान्यवरांचा जाहीर सत्कार होणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, परभणी येथील जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, केजच्या नगराध्यक्ष.सौ सीता बनसोड, हरूनभाई इनामदार, प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, प्रताप पवार, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. सचिन नागापूरकर, राजेभाऊ फड, प्रा.ईश्वर मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात एमपीएसडी परीक्षेत उत्तीर्ण झालेले इंजी.श्रीनाथ गीते व इंजी .सुमित लोमटे यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.