वार्ता समुहाचा १५फेब्रु.ला वर्धापन दिन पद्मश्री वामन केंद्रे, निकिता पाटील,. सोनाली भगरे व मान्यवरांची उपस्थिती


नगरभूषण पुरस्कार – लातुरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, सद्भावना पुरस्कार – जीवनआधार भक्तीप्रेम वृद्धाश्रम तर युवा गौरव पुरस्कार – डॉ.आदित्य पतकराव यांना जाहिर
मागील 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारितेची बीजे रोवणार्या अंबाजोगाई येथील दैनिक वार्ता समूहाने सातत्याने समाजमनाचे भान राखत सकारात्मक पत्रकारिता वृद्धींगत करत आणि उदयोन्मुख वेगवेगळ्या क्षेत्रातील चेहर्यांना पटलावर आणून त्यांच्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. वार्ता समूहाने 15 वर्ष पूर्ण करून 16 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानुषंगाने वार्ता समूहाचा 15 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा येत्या 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांंस्कृतिक सभागृह न.प.अंबाजोगाई येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र तथा एनएसडीचे माजी संचालक पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे, टिव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक व सह्योगी निर्मात्या निकिता पाटील व “चला हवा येवू द्या” फेम अभिनेत्री सोनाली भगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
मागील 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारितेची बीजे रोवणार्या अंबाजोगाई येथील दैनिक वार्ता समूहाने सातत्याने समाजमनाचे भान राखत सकारात्मक पत्रकारिता वृद्धींगत करत आणि उदयोन्मुख वेगवेगळ्या क्षेत्रातील चेहर्यांना पटलावर आणून त्यांच्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. वार्ता समूहाने 15 वर्ष पूर्ण करून 16 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानुषंगाने वार्ता समूहाचा 15 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा येत्या 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांंस्कृतिक सभागृह न.प.अंबाजोगाई येथे आयोजित केला आहे.
मान्यवरांची लाभणार उपस्थिती!
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र तथा एनएसडीचे माजी संचालक पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे, टिव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक व सह्योगी निर्मात्या निकिता पाटील व “चला हवा येवू द्या” फेम अभिनेत्री सोनाली भगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
मागील 14 वर्षांपासून वार्ता समूहाच्या वतीने राज्यभरात किंवा देशात किंवा परदेशात ज्यांनी अंबाजोगाई शहराचे नांव उज्ज्वल केले आहे. अशा व्यक्तीमत्वांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात किंवा देशभरात ज्यांच्या कर्तृत्वाची छाप उमटली आहे. अशा मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्या अमोघ वाणीचा स्पर्श अंबाजोगाईकरांना व्हावा या भुमिकेतून व्याख्यान आयोजित केले जाते. गेल्या 14 वर्षांपासून ही अखंडित परंपरा सुरू आहे. कोरोनाचा काळ असताना ही वर्धापनाच्या तारखेला न करता इतर वेळी साजरा करून परंपरा खंडित होवू दिली नाही. दरवर्षी अंबाजोगाईतील भूमिपुत्रांचा सन्मान करून ते करीत असलेले कार्य हे नव्या पिढीपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यंदाचा वार्ता समूहाचा 15 वा वर्धापन दिन हा येत्या बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आद्यकवी मुुकुंदराज सांस्कृतिक सभागृह न.प.अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केला आहे.


पोलिस अधिक्षक मुंडे यांना नगरभुषण पुरस्कार!
यंदाचा नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाई तालुक्यातील सनगावचे भूमिपुत्र तथा लातुरचे पोलिस अधिक्षक सोमय विनायकराव मुंडे यांना जाहिर करण्यात आला आहे. सोमय मुंडे हे अंबाजोगाई तालुक्याचे भूमिपुत्र असून त्यांनी पोलिस अधिक्षक म्हणून गडचिरोली येथे उत्कृष्ट काम करून 39 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मरदिनटोला येथे झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्यांना भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती शौर्य चक्र जाहिर झाले आहे. तसेच त्यांना राज्य आणि केंद्र सरकारने सन्मानित केलेले आहे. म्हणून त्यांचा गौरव अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे.
पवन गिरवलकर यांना सद्भावना पुरस्कार
तर सद्भावना पुरस्कार हा अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा या ठिकाणी असंख्य वृद्ध माता-पित्यांचा आधार ठरलेल्या जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम व त्याचे संचालक पवन गिरवलकर यांना जाहिर करण्यात आला आहे. पवन गिरवलकर व त्यांचे संपूर्ण कुटूंबिय हे या वृद्धाश्रमासाठी झोकून देवून काम करीत आहेत. 25 ते 30 वयोवृद्ध माता-पित्यांची ते सेवा करत आहेत. म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याचा व्यापक विचार करून त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
डॉ. आदित्य पतकराव यांना युवागौरव पुरस्कार!
तर युवागौरव पुरस्कार हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा पुणे येथे दंतरोग तज्ज्ञ म्हणून यशस्वीरित्या काम करत असलेले डॉ.आदित्य पतकराव यांना जाहिर करण्यात आला आहे. डॉ.आदित्य पतकराव यांच्या सामाजिक व वैद्यकिय कार्याबद्दल महामहिम तत्कालीन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी त्यांचे कौतुक केलेले आहे. तसेच वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याच्या अभिनव कामाची नोंद घेण्यात आलेली आहे. म्हणून त्यांना युवागौरव हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
पद्मश्री वामन केंद्रे, राजकिशोर मोदी, निकिता पाटील, सोनाली भगरे यांची प्रमुख उपस्थिती!
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स को.ऑप बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे राहणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून एनएसडीचे माजी संचालक तथा देशभरातील नामांकित नाट्य आणि सिनेनिर्माते पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे हे असणार आहेत. तर प्रमुख आकर्षण म्हणून यावर्षी टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका आणि सहयोगी निर्मात्या निकिता पाटील व अंबाजोगाईची भूमिकन्या आणि “चला हवा येवू द्या” या कार्यक्रमातील अभिनेत्री सोनाली मोतीचंद भगरे आदींसह अंबाजोगाई येथील सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता जी.पी.स्वामी, केजच्या नगराध्यक्षा सौ.सीता बनसोड, अंबाजोगाई आयएमएचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, जलसंपदा विभाग परभणीचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, अॅम्पा अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, केज न.प.चे गटनेते हारूण इनादार, एस.एन.एस.पतसंस्थेचे अध्यक्ष नाथभाऊ रेड्डी, अंबाजोगाई येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे, पिंपरी येथील सरपंच काशिनाथ कातकडे, अंबाजोगाई येथील उद्योजक प्रताप पवार, सां.बा.वि.लातुरचे आरेखक राजेंद्र घोडके, आपेगाव येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव जयजित शिंदे आदि मान्यवर उपस्थित राहणार असून गेल्या वर्षभरात ज्यांनी अंबाजोगाई शहरात व परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रात यश प्राप्त केले आहे. अशा गुणीजणांचा गौरव समारंभ होणार आहे.
१५ मान्यवरांचा होणार गौरव!
ज्यामध्ये रविंद्र (राजा) ठाकूर (शिक्षण), स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल होळंबे, बालरोगतज्ञ डॉ.सचिन पोतदार, सामाजिक कार्यात अनंत लोमटे, सुरेश कराड, संजय गंभीरे, भरत पतंगे तर राष्ट्रसेवेत कॅप्टन सुमित हरंगुळे, सांस्कृतिक क्षेत्रात ओंकार रापतवार, अविष्कार एडके, व्यवसायात स्वप्नील नरूटे, इंजि.आकाश कराड, कु.रिद्धीमा अभिजित सांगळे, तर आर्थिक क्षेत्रात मुडेश्वर महिला बचतगट, (मुडेगाव), तर बाळूमामा पुरूष बचतगट (पूस) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन…
तरी या कार्यक्रमास अंबाजागाई शहर व परिसरातील नागरिक बंधू, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते तसेच अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ.भा.मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई, अंबाजोगाई पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई, व्हाईस ऑफ मिडिया अंबाजोगाई तसेच गुडमॉर्निंग ग्रुप अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले आहे.