वसंत हंकारे यांचे 6 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत व्याख्यान


अंबाजोगाई शहरात जिजाऊ जन्मोस्तवानिमित्त दिनांक 6 फेब्रुवारी सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, बस स्टँड समोर आंबेजोगाई या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते तथा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे (सांगली) यांचे व्याख्यान कार्यक्रम आहे तरीआपापल्या किशोरवयीन मुलींना घेऊन विशेष करून माता पालकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक संग्राम महाराष्ट्राचा न्यूज चे संपादक अभिजीत व्यंकटराव लोमटे यांनी केले आहे.
जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने आयोजन


सध्याचे युग हे सोशल मीडिया मोबाईल टेलिव्हिजनचे आहे यामुळे आपल्या किशोरवयीन मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत.चौकाचौकांनी शाळा, क्लासेस,कॉलेज समोर टवाळखोर रोड रोमिओ मुलींचा पाठलाग करत असताना आपण नेहमी पाहतो आणि म्हणूनच यावर एकमेव उपाय म्हणजे आपल्या मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप देणे तसेच अनुचित प्रकार कुठेतरी थांबेल या हेतूने महिला व मुलींचे समुपदेशन काळाची गरज या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समजप्रबोधनकार वसंत हंकारे (सांगली) यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.6 फेब्रुवारी सकाळी ठीक 11 वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय या ठिकाणी केले आहे.
अभिजीत लोमटे यांनी केले आवाहन
आंबेजोगाई आणि परिसरातील तमाम माता पालकांनी आपापल्या शालेय महाविद्यालयीन किशोरवयीन मुलींना घेऊन या व्याख्यान कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संग्राम महाराष्ट्राचा न्यूजचे संपादक अभिजीत लोमटे यांच्या वतीने करण्यात येत आहे.