महाराष्ट्र

वकिली व्यवसाय करणाऱ्या महिलेवर सरपंचासह दहा जणांनी रिंगण करून काठी पीव्हीसी पाइप ने केली मारहाण

सरपंचांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ३६ वर्षीय ऍड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरुन गावाचे सरपंच व इतर दहा जणांनी शेतात रींगन करुन काठी आणि पिव्हीसी पाइपने जबर मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या गावी घडली.

सरपंचासह दहा जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी ऍड. ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकिलाच्या तक्रारीवरून सरपंचासह दहा जणांविरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीच्या घटनांमुळे बीड जिल्हा सतत चर्चेत

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे. अशातच अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ३६ वर्षीय महिला ऍड . ज्ञानेश्वरी अंजान यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ऍड. ज्ञानेश्वरी अंजान हीस (Female Lawyer Beating) सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली आहे. यात पाईपच्या मारहाणीमुळे सदरील महिला वकिलाचे अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे.

ध्वनी प्रदूषणाची तक्रार केल्याचा राग

या बाबतची अधिक माहिती घेतली असता सदरील घटनेतील पडीत महिला ऍड. ज्ञानेश्वरी अंजान हीने आपल्या घरासमोरील सतत होत असलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत संबंधित कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारी नंतर ऍड. ज्ञानेश्वरी अंजान हीस संबंधित ध्वनी प्रदूषणाची तक्रार केलेल्या लोकांनी अमानुष मारहाण केली असल्याचे उघडकीस आले आहे.

बेशुद्धावस्थेत जाईपर्यंत केली मारहाण

मारहाणीनंतर ऍड. ज्ञानेश्वरी अंजान बेशुद्धावस्थेत पडली असतांनाच पोलिसांनी त्यानंतर तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करुन घरी पाठवल्याचे समजते.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करणा-या ऍड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांचे मारहाणीनंतरचे फोटो समाज माध्यमांवर आल्यानंतर समाज माध्यमातुन सदरील मारहाण करणाऱ्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

▪️जितेंद्र आव्हाड आणि रक्षा खडसे यांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड jitendra ahawad, महिला आघाडी प्रमुख रक्षा खडसे Raksha Khadse यांनी समाज माध्यमांवर या मारहाणी ची पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर या मारहाणीचा धक्कादायक प्रकार संपुर्ण महाराष्ट्रापुढे समोर आला आहे.

एकट्या महिलेला दहा पुरुषांनी रिंगण करुन मारणे कितपत योग्य?

अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली व्यवसाय करणार्‍या ऍड. ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केल्याची समाज माध्यमांवर चर्चा सुरु होताच या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिसांनी सनगाव चे सरपंचासह इतर दहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल आता जितेंद्र आव्हाड jitendra ahawad यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

▪️खुन करण्याच्या उद्देशानेच मारहाण ; ऍड. ज्ञानेश्वरी अंजान हीचे म्हणणे

या संदर्भात मारहाण केलेल्या वकील महिलेने हा हल्ला सरपंच व इतर दहा जणांनी केला असल्याचे म्हटले आहे. ध्वनी प्रदूषणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे सर्वजण १६ मार्च पासून माझ्यावर सतत पाळत ठेवून होते. काल आपण आपल्या शेतातील आंबे तोडून आणण्यासाठी गेलो असता शेतातच या दहा लोकांनी रिंगण करुन आपल्याला जबर मारहाण केली. आपला खुन करण्याच्या उद्देशानेच ही मारहाण केली असल्याचा आरोप ऍड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी केला आहे. या मारहाणीत मी बेशुद्ध होवून पडेपर्यंत मला मारहाण करण्यात आली. नंतर पोलिसांनी येवून मला रुग्णालयात दाखल केले असल्याचे ऍड. ज्ञानेश्वरी अंजान यांनी म्हटले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker