वकिली या पवित्र व्यवसायातून सामान्य माणसांना न्याय मिळवून द्यावा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230808_211911-1024x372.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230808_211911-1024x372.jpg)
ऍड. एस. के. शेळके यांचे मत
वकिली व्यवसाय हा पवित्र व्यवसाय असून, धंदा नाही. त्यामुळे वकिलांनी वकिली व्यवसायातून सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. शेळके यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा, जिल्हा न्यायालय वकील संघ आणि प्रशासकीय न्यायाधिकरणावर नियुक्त नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मैत्री दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाप्रमूख ॲड. सुधीर चौधरी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस.के.शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. डी.एन. सूर्यवंशी, ॲड. नंदकुमार खंदारे, अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवर, धनंजय बोटवे, ॲड. दिलीप चौधरी, प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळंके यांची उपस्थिती होती.
यावेळी पाहुण्याच्या हस्ते उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एन. एल. जाधव, सचिव ॲड. आर. के. इंगोले, उपाध्यक्ष ॲड. सबाहत काझी, सहसचिव ॲड. अमोल जगताप, ॲड. सुधा चिंतामणी, खजिनदार ॲड. दत्ता मडके, ग्रंथालय समिती चेअरमन ॲड. प्रशांत बोराडे, ग्रंथालय समिती सचिव ॲड. अशोक राऊत, सदस्य ॲड. निलेश भागवत, ॲड. बी. यु. गोसावी, ॲड. जनाबाई आवटे, ॲड. वनिता सांगोळे, ॲड.पार्थ साळुंखे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश मुंडवाडकर, सचिव ॲड.सदानंद सोनुने,ॲड श्रीनिवास तालावार,ॲड अनुराधा मगरे, ॲड रौहण नवले,यांच्यासह इतरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सुनील लांजेवर म्हणाले, समाजाच्या हितासाठी कायदेशीर प्रक्रियेमधील वकील हा महत्वाचा भाग आहे. हा व्यवसाय अतिशय सन्मानित असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदीप सोळंके म्हणाले, वकिलांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये लक्ष घालून लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उच्च न्यायालय वकील संघाचे ॲड. नरर्सिंग जाधव, जिल्हा वकिल संघाचे ॲड. मुंडवाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक ॲड. सुधीर चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. महेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. सुधीर चौधरी, ॲड. रेखा चौधरी,ॲड शिल्पा अवचार ,ॲड. प्रशांत सूर्यवंशी,ॲड. जयसिंग तौर,ॲड अभिषेक हजारे,ॲड श्री मनोज शिंदे,ॲड सुजित पाटिल,ॲड निलेश पाटिल
यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.