पक्ष श्रेष्ठींशी चर्चा न करताच भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देणारे वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण याच्या तोंडाला काळे फासून चाबकाने फटके मारणा-या वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, तालुकाध्यक्ष गोविंद मस्के व त्यांच्या इतर ३ सहका-यांविरुध्द पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन गजाआड केले आहे.
शहर पोलीसांनी दाखल केला गुन्हा
या संदर्भात अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बदने यांनी वरील पाच जणांविरुद्ध रितसर फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. संतोष बंधने यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, केज विधान सभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांचे प्रचार कार्यालय रमाबाई चौक येथे आहे. सदर कार्यालयामध्ये दिनांक १६/११/२०२४ रोजी १३:३० वाजणेच्या पुर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, त्यांचे सोबत असलेले गोविंद मस्के रा. अंबाजोगाई व इतर ८-९ इसमानी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांनी भाजपा पक्षाशी हातमिळवणी केली म्हणुन त्यांचे तोंडाला काळे फासुन त्यांना चापटाने व वायरने मारहाण केल्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झालेला पाहण्यास मिळाला.
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर ३ कार्यकर्त्यांचा समावेश
यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे व त्यांचे सोबतचे गोविंद मस्के व इतर ८-९ इसमांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांचे तोंडाला काळे फासवुन त्यांना चापटाने व वायरने मारहान करून मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांचे जामाबंदी आदेश क्र. २०२४/गृह विभाग/प्र.कार्यवाही/ १/१/मु.पो.का.कलम १९५१-२३९ दिनांक १४/११/२०२४ चे उल्लंघन केले म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कलम १८९(२), १८९(२), १९१(३), १९०, ११५(२), ११८(१) भारतीय न्याय संहीता, सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे
१) शैलेद्र बाबुराव कांबळे वय ४६ वर्ष रा नागझरी परीसर अंबाजोगाई २) गोविंद खंडु मस्के वय ४१ वर्ष रा संत कबीर नगर अंबाजोगाई, ३) धम्मानंद रानबा कासारे वय ४० वर्ष रा गिरवली ता. अंबाजोगाई, ४) जयपाल विष्णु दहीवडे वय ३५ वर्ष रा अंबलवाडी ता अंबाजोगाई
५) सतिश पंडीत सोनवणे वय ३३ वर्ष रा. संत कबीर नगर अंबाजोगाई यांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.
जिल्हा कारागृहात रवानगी!
सदरील फिर्यादीवरून शहर पोलीसांनी वरील पाच ही आरोपींना अटक करुन त्यांची रवानगी जिल्हा कारागृह बीड येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
प्रकाश आंबेडकर यांची पाठराखण
दरम्यान या संपुर्ण प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातील विविध विभागात उन उमटत आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात सचीन चव्हाण यांस मारहाण करणारे वंचित चे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, तालुकाध्यक्ष गोविंद मस्के व इतर सहभागी कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.