लोक अदालतीत 1,218प्रकरणे निकाली; 1 कोटीचा दंड वसुल
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/12_1580994172-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/12_1580994172-300x225.jpg)
अंबाजोगाई येथे दि. 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालीमध्ये विविध प्रकारची प्रकरणे दाखलपूर्व व प्रलंबीत दिवाणी व फौजदारी 1,218 प्रकरणे मोठया संख्येने निकाली लागले.
या सर्व प्रकारात सदरील प्रकरणातील रू. 1,97,19,037/- इतकी रक्कम वसूल झाली आहे. सदर राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी दिपक द. खोचे जिल्हा न्यायाधीश- 1, अंबाजोगाई, संजश्री जे. घरत जिल्हा न्यायाधीश-2, अंबाजोगाई, विक्रमादित्य कि. मांडे जिल्हा न्यायाधीश – 3, अंबाजोगाई कुणाल ध. जाधव जिल्हा न्यायाधीश – 4, अंबाजोगाई, चेतन पा. भागवत दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अंबाजोगाई, शिवदत्त म. पाटील सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अंबाजोगाई, जुबेर जाफर खॉन सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई, सचिन दु. मेहता 3 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई, बालवीर एन. गोडबोले 4 थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई तसेच अॅड. श्रीधर बी. डिघोळे, निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रभारी अध्यक्ष वकील संघ, अंबाजोगाई व सर्व विधीज्ञ, तसेच अधिक्षक आर. डी. पैठणकर व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीरित्या पार पडले.