लातुर बाजारपेठेत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ !

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काल बाजारभावात वाढ झाली आहे. लातूर बाजारसमितीत मध्ये काल सोयाबीनला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. दर वाढले की शेतीमालाची आवक वाढणार हे निश्चित मानले जाते. सोयाबीनच्या बाबतीत सबंध हंगामात असे पाहवयास मिळाले नाही. दर वाढले तरी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानेच विक्री केलेली आहे. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दरात वाढ होत आहे.
बळीराजाच्या एक माला पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याची संकेत दिसू लागले आहेत. राज्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे. यावर्षी अवेळी झालेल्या त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे उत्पादन घटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने त्यांना होणारा फायदा हा कमी झाला. त्यातच कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान झाले होते. अशा वेळेस जर शेतकरी बांधवांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास त्यांचे होणारे नुकसान हे भरून निघू शकते. सर्व सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी भाव कधी वाढणार याची वाट पाहत होते.
येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना घरचे गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे पेरणीसाठी मिळावे, बियाणांचा तुटवडा जाणवू नये याकरिता कृषी विभागाच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षीही उन्हाळी सोयाबीन लावगडीचे नियोजन केले आहे. सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत यावर्षी जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.
उन्हाळी सोयाबीन उत्पादनातून निघणारे चांगल्या प्रतिचे बियाण्याची निवड करून बीजप्रक्रिया करून पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन कृषी अधिकारी भास्कर रणदिवे यांनी केले आहे. यावर्षी पाण्याची मुबलक उपलब्ध असल्याने उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असेल, तसेच कृषी विभागाकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल, असे श्री. रणदिवे यांनी सांगितले.