लातुर एमआयडीसी ला मांजरा धरणातील जाणारे पाणी बंद करा पिण्यासाठी पाणी आरक्षित करा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1041517250-1692719684786.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1041517250-1692719684786.jpg)
राजकिशोर मोदी; राजेश्वर चव्हाण यांची मागणी
लातूर एमआयडीसी ला मांजरा धरणातील देण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करा; काळवीट साठवण तलावातील पाणी उपसा करणा-या विद्दुत मोटारी जप्त करा आणि या दोन्ही तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, यावर्षी पावसाळा सुरू झाला तेव्हापासून धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे मांजरा धरणातील पाणीपातळीत कमालीची घट होतांना दिसून येत आहे . सध्याची पाणी परिस्थिती पाहता मांजरा धरणारतील लातूर एम आय डी सी ला वितरित केला जाणारा पाणी पुरवठा तात्काळ थांबवावा आणि काळवटी तलावातुन शेतकऱ्यांकडून अवैध रित्या होत असलेला पाणी उपसा देखील बंद करून सदरील दोन्ही ठिकाणचा संपूर्ण पाणीसाठा हा केवळ नागरिकांच्या पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जिल्हाधिकारी बीड यांना उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230830-WA0099-1024x455.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230830-WA0099-1024x455.jpg)
धनेगाव येथील मांजरा धरणातुन लातूर शहर ,लातूर एम आय डी सी ,अंबाजोगाई शहर, त्याचबरोबर केज व धारूर शहरास पाणीपुरवठा करण्यात येतो . यावर्षी पावसाळा सुरू झाला तेव्हापासून धरण पाणलोट क्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे मांजरा धरणाराच्या पाणी पातळीत कसलीही वाढ न होता त्यामध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर अंबाजोगाई, केज, धारूर परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-966352152-1693385291418.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-966352152-1693385291418.jpg)
त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी लातूर जिल्हा एम आय डी सी साठी मोठ्या प्रमाणावर वितरित केला जाणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवून मांजरा धरणातील संपूर्ण पाणीसाठा नागरिकांच्या पिण्यासाठी पुर्णतः आरक्षित करावा अशा आशयाचे आदेश मुख्य अभियंता मांजरा प्रकल्प धनेगाव यांना देण्यात यावेत. त्याचबरोबर काळवटी तलावातून तेथील शेतकऱ्यांकडून अवैधरित्या केल्या जात असलेला पाणी उपसा देखील तात्काळ थांबवावा अशी मागणी राजकिशोर मोदी यांच्यासह संपूर्ण अंबाजोगाई शहर व तालुकावासीयांच्या वतीने करण्यात येत आहे. सदरील निवेदनावर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, काझी खयामोद्दीन, सुनील वाघाळकर ,अमोल लोमटे, दिनेश भराडीया, सुनील व्यवहारे , विष्णू पांचाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .