रिक्त जागांमुळे स्वारातीच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तर जागांवर टाच!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102158-1024x768.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102158-1024x768.jpg)
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिली नोटीस
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील रिक्त जागांची दखल घेत पदव्युत्तर शिक्षण बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या नोटीस बजावली असून रिक्त जागा त्वरीत भरा अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षापासून या विभागातील पदव्युत्तर शिक्षण बंद करण्यात येईल या अशयाची नोटीस बजावली आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील पदव्युत्तर शिक्षण सुरु ठेवण्यासाठी मार्च २०२३ मध्ये इन्स्पेक्शन केले होते. या इन्स्पेक्शन मध्ये तपासणी अधिका-यांनी या विभागातील रिक्त प्राध्यापक आणि स्टाफ यांच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. तसा अहवाल 20 मार्च 2023 रोजी त्यांनी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी निर्मिती शास्त्र विभागामार्फत तत्कालीन सचीव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्फत पाठवला होता.
रिक्त जागांवर काढली त्रुटी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102043-1024x492.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102043-1024x492.jpg)
सदरील अहवालात या विभागात एक प्रोफेसर, 2 सहयोगी प्राध्यापक, 2 सिनियर रेसिडेंट व इतर जागा रिक्त असल्याचे, ग्रंथालयात या विभागाच्या अभ्यासक्रमाची सर्व जुनी पुस्तके असल्याचे, नवीन संशोधनात्मक प्रबंध नसल्याचे म्हटले आहे. संदर्भीय अहवालानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना पत्र क्रमांक 35/46/(230)/ 2022PGMEB/051824- दि. 25/9/2023 रोजी पाठवले असून संदर्भीय पत्रात स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागातील रिक्त जागा भरा अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर शिक्षण विभागातील जागा भरण्याची प्रक्रिया बंद करू असे म्हटले आहे.
30 दिवसांच्या आत लेखी खुलासा करा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102028-1024x879.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102028-1024x879.jpg)
या संदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेल्या नोटीसीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाने 30 दिवसांच्या आत या नोटीसीचे लेखी उत्तर द्यावे, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कायम ठेवायच्या असतील तर रीतसर पीस भरुन लवकरात लवकर सदरील विभागाचे पुन्हा इन्स्पेक्शन करुन घ्यावे असे म्हटले आहे. या पत्रावर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (PGMEB) विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी अयुजेंद्र सिंग यांची स्वाक्षरी आहे.
पदव्युत्तर विद्दार्थ्यांच्या १८ जागा होणार रिक्त
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image364108776-1695963850756-284x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image364108776-1695963850756-284x300.jpg)
वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात प्रति वर्षी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 6 विद्दार्थ्यांच्या जागा भरण्यात येतात. हा अभ्यासक्रम 3 वर्षांचा असल्यामुळे या विभागात प्रथम वर्षाचे 6, व्दितीय वर्षाचे 6 आणि तृतीय वर्षाचे 6 असे एकुण 18 विद्दार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा रुग्ण सेवेत मोठा उपयोग होत असतो.
तर येणार मोठा ताण!
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात प्रसुती व उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे. या विभागातील प्रसुती विभागातील उच्च सेवेची नोंद या परिसरात असल्याने या विभागात रुग्णांची सतत मोठी गर्दी असते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेल्या या नोटीसीचे पुर्तता वैद्यकीय महाविद्यालयाने पुर्ण केली नाही तर रुग्ण सेवेवर मोठा ताण येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102059-1024x766.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230929_102059-1024x766.jpg)