राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा बनली एक लोकचळवळ!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/rahul-gandhi-bharat-jodo.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/rahul-gandhi-bharat-jodo.jpg)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडा यात्रा आता फक्त कॉंग्रेस पक्षापुरतीच मर्यादित राहिली नाही तर ती एक लोकचळवळ बनली आहे असं मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही कायम टिकवण्यासाठी ही पदयात्रा निघाली असुन या पदयात्रेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातुन तरुण मुलं-मुली, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग अभुतपुर्व असा आहे. बेरोजगारी, दडपशाही, महागाई या सारख्या मुद्द्यावर लोक स्वतःहुन आपल्या व्यथा राहुल गांधी यांच्या कडे मांडत आहेत.
भारतजोडो यात्रा हा केवळ कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रम राहीला नसुन ती एक लोकचळवळ बनली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, जनता दल अशा राजकीय पक्षांसह अनेक लोकचळवळी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, विचारवंत अशा अनेक घटकांकडुन भारत जोडतो यात्रेला मिळणारे समर्थंन विलक्षणीय आहे. भारत जोडतो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासादरम्यान वरील सर्व घटकांतील नेते, प्रमुख मंडळी विविध ठिकाणी या यात्रेत सहभागी होणार आहेत.त्यांचे ट्रॅव्हल प्लॅन सुध्दा तयार झाले आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेने एक नवा इतिहास निर्माण केला आहे.जगभरात त्यांची दखल घेतली जात आहे. ही यात्रा आपल्या महाराष्ट्रातुन जाणार आहे आणि या यात्रेचे स्वागत करण्याच, त्यात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे.
७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात; नांदेड जिल्ह्यात ४ मुक्काम!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/file720a0104ryfqcx4m29f-1571246448.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/file720a0104ryfqcx4m29f-1571246448.jpg)
भारत जोडो यात्रेचे आगमन महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तेलंगणातुन ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. देगलुर येथील नगर परिषदेच्या कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर, शंकरनगर रामतीर्थ, वझरगा फाटा आणि पिंपळगाव महादेव या चार ठिकाणी या यात्रेचे मुक्काम असणार आहेत. या यात्रे दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी भोपळा व ९ नोव्हेंबर रोजी कृष्णुर येथील एमआयडीसी येथे कॉर्नर मिटींग आयोजित करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर ला दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलुर नाका येथुन ही पदयात्रा निघेल, पुढे बाफना की पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुथा चौक वजिराबाद, कलामंदिर, शिवाजी नगर, महात्मा जोतिबा फुले पूतळा पद्मश्री डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा या मार्गे जाईल. १० नोव्हेंबर लाच सायंकाळी ५ वाजता नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होईल.
यासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मराठवाड्यात विशेषतः नांदेड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये या यात्रेमध्ये प्रचंड उत्सुकता, कुतुहल, आकर्षण आहे. लोक स्वतः हुन या यात्रेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत. रोज शेकडो लोकांचे फोन येत आहेत. त्यामुळे या यात्रेसाठी “मी पण चालणार….” हे घोष वाक्य आम्ही जाहीर केले आहे. नांदेड जिल्ह्यातील या यात्रेसाठी माहिती देण्यासाठी आम्ही ९९३ ९९३ २२३३ हा मोबाईल क्र. २ नोव्हेंबर पासून सकाळी ११ वाजता सुरू करीत आहोत. या मोबाईल क्रमांकावर फक्त नांदेड जिल्ह्यातील यात्रेबाबतच माहिती दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे एलइडी व्हॅन्स, सोशल मेडिया, व इतर सर्व माध्यमातून भारत जोडो यात्रेची माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
भारत जोडो यात्रेचे नियोजन ही फार मोठी जबाबदारी आहे. एक मोठे आयोजन आहे. गुरुतागद्दी त्रिशताब्दी वर्षाचा सोहळा हे देखील अशाच प्रकारचे खुप मोठे नियोजन होते. तशाच प्रकारचे मोठे आयोजन भारत जोडो यात्रेचे आहे. मागील महिनाभरापासून आमची सर्व टीम या भारत जोडतो यात्रेच्या नियोजनाच्या कामाला लागली आहे. भारत देशात च नव्हे तर जागतिक इतिहासात नोंद घ्यावी लागणा-या या भारत जोडो यात्रेचे प्रत्यक्ष स्वागत करण्याची, सहभागी होण्याची संधी नांदेड जिल्ह्यातील लोकांना मिळणार आहे.
उमरगा येथे मोटारसायकल रॅली!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221102_110914.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221102_110914.jpg)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारतजोडो यात्रेच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (३१ऑक्टोबर) रोजी उमरगा शहरातुन भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
सदरील भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ (दि.३१) रोजी शरण बसवराज यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहरातून काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश महालिंग बाबशेट्टी, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, जिल्हा सरचिटणीस गौस शेख, सतीश पाटील, विजय वाघमारे, राहुल हेबळे, पप्पू संगर, महेश माशाळकर,भारत मारेकर, विक्रम मस्के, महादेव कारभारी, याकुब, यशपाल कांबळे, पाटील, राहुल कारभारी, विक्रम दासमे, इनामदार आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण यांचा नियोजनावर आक्षेप?
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/Prithviraj-Chavan.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/Prithviraj-Chavan.jpg)