महाराष्ट्र

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या दणक्यामुळे राज्यातील रुग्ण खाटात होणार वाढ

यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळासाठी वाढणार निधी


राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या दणक्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव सादर करण्यात पाठोपाठच आता राज्यातील शासकीय रुग्णालयातील खाटा वाढवण्याचा नव्याने प्रस्ताव आता राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील राज्यशासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांची शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रणा ही अत्यंत कुचकामी ठरत चालली असल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्य शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा आणि रुग्णांच्या आरोग्य सुविधेत वाढ करा अन्यथा आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात चालवण्यात येणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करु असा सज्जड दम दिला होता. यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी राज्य शासनाच्या वैद्यकीय सचिवांकडे वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग १ ते वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव दाखल केला.
आता या प्रस्तापाठोपाठ आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या व अतिविशेष उपचार रुग्णालय असलेल्या ३० रुग्णालयातील रुग्ण खाटात वाढ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचीवांकडे दाखल केला आहे.


राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी सादर केलेल्या या प्रस्तावात राज्यातील खालील रुग्णालयात वाढीव खाटा वाढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सध्याच्या मंजूर खाटा १३५२, सध्याच्या खाटा १३५२, बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे मंजूर खाटा १२९६ सध्याच्या खाटा १८००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती मंजूर खाटा ४०० सध्याच्या खाटा ३२०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज मंजूर खाटा १२० सध्याच्या ३१५, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली मंजूर खाटा ३८८ सध्याच्या खाटा ३८८, व्ही. एन. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मंजूर खाटा ७६३ सध्याच्या खाटा ७६३, रा. छ.शा.म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर मंजूर खाटा ६६५ सध्याच्या खाटा ९८०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मंजूर खाटा ११७७, सध्याच्या खाटा २०१८, एस. आर. टी. आर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई मंजूर ५१८ मंजूर खाटा सध्याच्या ७५०, डॉ. शां. च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड मंजूर खाटा ५०८ सध्याच्या खाटा १०८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ७९०, श्री. भा. वह. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे मंजूर खाटा ५४५ सध्याच्या खाटा ६२०,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर मंजूर खाटा ५९४ सध्याच्या खाटा ८३०, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मंजूर खाटा ५९४ सध्याच्या खाटा १११६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ मंजूर खाटा ५९४ सध्याच्या खाटा १११६, स्त्री रुग्णालय, यवतमाळ मंजूर खाटा ९४ सध्याच्या खाटा ९४, अतिविशेषोपचार रुग्णालय, यवतमाळ मंजूर खाटा २०० सध्याच्या खाटा २००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला मंजूर खाटा ४७६ सध्याच्या खाटा८४०,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर मंजूर खाटा ६५० सध्याच्या खाटा ५५०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया मंजूर खाटा ५१० सध्याच्या खाटा ५१०, सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई मंजूर खाटा ४६७ सध्याच्या खाटा ४६७, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई मंजूर खाटा ५२१ सध्याच्या खाटा ५२१, कामा आल्ब्लेस रुग्णालय, मुंबई मंजूर खाटा ५०५ सध्याच्या खाटा५०५,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदूरबार मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग मंजूर खाटा ५०० सध्याच्या खाटा ५०० , कॅन्सर हॉस्पीटल, औरंगाबाद मंजूर खाटा १०० सध्याच्या खाटा १६५, अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर मंजूर खाटा २३० सध्याच्या खाटा २६१ , ट्रॉमा केअर सेंटर, नागपूर मंजूर खाटा ९० सध्याच्या खाटा १३५ वाढवण्यात याव्यात असे सुचवले आहे.
सदरील प्रस्तावामध्ये रुग्णालयात वाढवण्यात येणाऱ्या रुग्णालयांत या वाढीव रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व औषधोपचारासाठी ही आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती केली आहे.

स्वारातीच्या रुग्णालयात वाढणार २३२ खाटा!

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या ५१८ रुग्ण खाटा आहेत. या नव्या प्रस्तावामुळे या रुग्णालयात ७५० रुग्ण खाटा होणार आहेत. सोबतच रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ ही वाढणार आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालया सोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासह औरंगाबाद येथील कॅन्सर हॉस्पिटल रुग्णालयाच्या खाटात ही वाढ होणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker