रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पौराहित्यासाठी बीडच्या नारायण देवा सुलाखे यांना निमंत्रण
अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येसह देशभरात सोहळ्याचा उत्सव होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक रामजन्मभूमीत येणार आहेत.हजारो पुरोहितांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे यात बीडमधून वे शा स नारायण देवा सुलाखे,चंद्रशेखर भोगे,घनश्याम जोशी,दिवाकर रामदासी,संतोष कुरलेकर,मिथुन निर्मळ,राजू पाठक यांचा समावेश आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून दिग्गजांचीही उपस्थिती आहे. तब्बल ११ हजार व्हीआयपींची उपस्थिती सोहळ्याला असणार आहे. या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या पुजेचा मान देशभरातील ११ दाम्पत्यांस देण्यात आला आहे,पूजेसाठी बीडमधून पौरोहित्य करण्यासाठी बीडमधून 6 पुरोहितांना निमंत्रण देण्यात आले आहे
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात महाराष्ट्राचं प्रातिनिधिक योगदान देत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. २२ जानेवारी रोजी देशातील ११ जोडप्यांच्या हस्ते प्रभू श्री राम यांची महापूजा होणार आहे. त्यात पौरोहित्य करण्याचा मान बीडला देखील मिळत आहे यासाठी बीडमधून वे शा स नारायण देवा सुलाखे यांच्यासहित 6 जणांना निमंत्रित करण्यात आले आहे हे सर्व पुरोहित आयोद्धेकडे रवाना झाले आहेत सर्व पुरोहितांचे अभिनंदन करण्यात येत आहे