महाराष्ट्र

राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया यंत्रसामुग्री खरेदीसाठी ११४.६६ कोटींची तरतूद

राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामुग्री खरेदीसाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालनालयाने नुकतीच ११४ कोटी ६६ लक्ष रुपयांची तरतूद केली असून यापैकी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण होणाऱ्या हाय टेक शस्त्रक्रिया गृहातील आवश्यक यंत्रसामग्री खरेदी साठी ५ कोटी ४६ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने या संदर्भात १० जानेवारी रोजी या संबंधीचा शासन निर्णय क्रमांक जीएचपी२०२३/प्रक्र१८६/प्रशा-१ जारी केला असून या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये
विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना मॉड्युलर ऑपरेशन थिएटर विथ टर्न की अंतर्गत राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून यंत्रसामुग्री खरेदीस ११४ कोटी ६६ लक्ष रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना आवश्यक यंत्र खरेदीकरीता राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून रुपये ११४,६६,०००/- (रुपये एकशे चौदा कोटी, सहासष्ट लक्ष फक्त) इतका निधी खालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना
यंत्रसामुग्री खरेदी करण्यास या शासन निर्णयान्वये अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयां मध्ये

१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर साठी १० कोटी ९२ लक्ष,
२) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर ५.४६
३) वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर १० कोटी ९२ लक्ष
४) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज ५ कोटी ४६ लक्ष
५) पद्मश्री वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सांगली ५ कोटी ४६ लक्ष
६) राजर्षि छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापुर
१० कोटी ९२ लक्ष
७) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती १० कोटी ९२ लक्ष
८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर ५ कोटी ४६ लक्ष
९ ) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
५ कोटी ४६ लक्ष
१०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर ५ कोटी ४६ लक्ष
११) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव ५ कोटी ४६ लक्ष
१२) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला ५ कोटी ४६ लक्ष
१३) श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ ५ कोटी ४६ लक्ष
१४) डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड १० कोटी ९२ लक्ष


१५) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई ५ कोटी ४६ लक्ष
१६) श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे ५ कोटी ४६ लक्ष
अशा एकुण ११४ कोटी ६६ लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सदरील शासन निर्णय राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यपालांच्या अनुमतीने निर्गमित करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. या शासकीय आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या कार्यासन अधिकारी सुधीर जया शेट्टी यांची स्वाक्षरी आहे.

आ. नमिता अक्षय मुंदडा यांचे विशेष प्रयत्न

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे उपचार करण्यात यावेत यासाठी या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत भरपुर निधी उपलब्ध करून दिला आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वीच येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मॉड्युलर शस्त्रक्रिया गऋहआसआठई १० कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. आता याच मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहासाठी ५ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या या भरीव निधी बद्दल सामान्य नागरिकांमधून आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानत आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker