राज्यस्तरीय बहुभाषिक संमेलनास खा. इमरान प्रतापगढी व खा. सौ. रजनीताई पाटील यांची उपस्थिती


दिनांक 11 व 12 मार्च 2023 रोजी जिजामाता महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनास खा. इमरान प्रतापगढी व खा. सौ. रजनीताई पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांनी दिली.
11 व 12 मार्च रोजी अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय बहुभाषिक परीवर्तन साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीतज्ञ ॲड. आण्णाराव पाटील (मुंबई वकील बार असोसिएशन सदस्य व महाराष्ट्र विकास आघाडी अध्यक्ष) व स्वागताध्यक्ष मा. असीफोद्दीन खतीब यांची उपस्थिती राहणार आहे.


या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणुन खा. इमरान प्रतापगढी व खा. रजनीताई पाटील यांना दिल्ली येथील निवासस्थानी जावुन निमंत्रण देण्यात आले असून, खा. रजनीताई पाटील व खा. इमरान प्रतापगढी यांनी निमंत्रण स्विकारले असून, संमेलानास उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली असून, संमेलनात राजकीय पक्षाचे नेते, मान्यवर लेखक, कादंबरीकार उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक विद्याधर पांडे यांनी दिली आहे.