राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्र चेतना दौड
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_143950-1024x815.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_143950-1024x815.jpg)
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने १२ जानेवारी रोजी राष्ट्र चेतना दौंड स्पर्धेचे आयोजन वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम
सदरील राष्ट्र चेतना दौड ही स्पर्धा महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिला वयोगट १७ ते ३५ वर्षाचा असेल त्यासाठी ६ किमी चे अंतर ठरवण्यात आले आहे तर दुसरा वयोगट ३५ वर्षापुर्वी व असणार असून त्यांचेसाठी ३ किमी चे अंतर ठरवण्यात आले आहे.
१२ जानेवारी रोजी सकाळी ५:३० वाजता
ही स्पर्धा १२ जानेवारी रोजी सकाळी ५:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू करण्यात येणार असून पहिल्या गटांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक – संत भगवान बाबा चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक हे ६ किमी चे अंतर निश्चित करण्यात आले आहे. दुसऱ्या गटांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवानबाबा चौक हे ३ किमी चे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_170846-738x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_170846-738x1024.jpg)
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दोन गट
या दोन्ही गटातुन पहिल्या तीन स्पर्धाकांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही गटातुध पहिल्या येणाऱ्या स्पर्धकासाठी रोख ५०००/- व प्रशस्तीपत्र, व्दितीय येणाऱ्या स्पर्धकासाठी रोख रु ३०००/- व प्रशस्तीपत्र, तृतीय येणाऱ्या स्पर्धकासाठी रोख रु. २०००/- व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ स्पर्धकासाठी रोख रु.५००/- व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या शिवाय या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत सहभाग घेणा-या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_171116-956x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_171116-956x1024.jpg)
नंदकिशोर मुंदडा यांचे आवाहन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230105-WA0194-212x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230105-WA0194-212x300.jpg)
या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी डॉ. निशिकांत पाचेगावकर 9422489844 ( वयोगट 17 ते 35 पुरुष) ,
प्रकाश बोरगावकर 7517664761 (वयोगट 35 ते पुढे पुरुष),
योगेश कडबाने 8888350084 (मुली व महिला) यांनी वरील क्रमांकावर वॉटसऍप व्दारे संपर्क साधावा.
सहभाग नोंदणीसाठी स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, आधारकार्ड, व आपली जन्मतारीख वरील क्रमांकवर व्हॉट्स ॲप द्वारे पाठवावे. असे आवाहन संयोजक नंदकिशोर मुंदडा यांनी वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.