राजकीय पक्षांच्या उदासीन भुमिकेमुळे अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता वाढवण्याची गरज
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150831-1024x491.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150831-1024x491.jpg)
राज्यात आणि देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतांनाच या प्रश्नाकडे सर्वच राजकीय पक्षांची उदासीनतेची भुमिका असल्यामुळे अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता वाढवण्याची गरज असल्याचे मत किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी व्यक्त केले.
राज्यातील आणि देशातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. या आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अंबाजोगाई येथील सर्व कार्यक्रमाच्या पुर्व तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अमर हबीब बोलत होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150743-1024x547.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150743-1024x547.jpg)
अंबाजोगाई येथील पत्रकार कक्ष मधृये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मार्गदर्शन करताना अमर हबीब पुढे म्हणाले की, देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस सतत वाढत चालले आहे. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात आहेत तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यातील आहेत. असे असताना राज्यात व देशात कार्यरत असलेला एक ही राजकीय पक्ष शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्याबाबत ठोसपणे बोलत नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने गेली आठ वर्षांपासून १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते तर गेली दहा वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी विरोधी तीन जाचक कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येते. मात्र या मागणीकडे राज्यातील एकाही राजकीय पक्षाने अद्दापपर्यंत गांभीर्याने पाहिले नाही, ही अस्वस्थ करणारी बाब आहे.
विविध राजकीय पक्षांची ही भुमिका लक्षात घेता किसान पुत्रांनी आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज असल्याचे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150938-1024x541.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150938-1024x541.jpg)
अंबाजोगाई येथील सुसज्ज पत्रकार कक्षात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या प्रास्ताविकात स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देताना या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या व्याख्यानाचे व सामुहिक उपवास सोडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या सर्व कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांना अशा पध्दतीने सहभागी करुन घेता येईल याचे नियोजन करण्यासाठी ही बेटा असल्याचे सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150717-1024x529.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230206_150717-1024x529.jpg)
या चर्चेत किसान पुत्र प्रा. देविदास खोडेवाड, पत्रकार संतोष बोबडे, माजी सरपंच वसंत मोरे, अनिकेत डिघोळकर, महावीर भगरे, अनिरुध्द चौसाळकर, मुजीब काजी, बाबुराव मस्के, राजेंद्र कुलकर्णी, ऍड. संतोष पवार , पत्रकार दत्ता वालेकर, रेखा असरडोहकर, प्रा. शैलजा बरुरे, अनंत निकटे गुरुजी, शिवप्रसाद येळकर, पत्रकार सुनिल सिरसाठ यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला. अन्नत्याग आंदोलनाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व किसान पुत्रांचे आभार अनिकेत डिघोळकर यांनी मानले.