महाराष्ट्र

‘राइट टू हेल्थ बील’ला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध; डॉ.नवनाथ घुगे

काळ्या फिती लावून केली रुग्णसेवा!

राजस्थान सरकारने नुकत्याच पास केलेल्या राइट टू हेल्थ बीलाला विरोध दर्शवण्यासाठी व जयपुर येथे आंदोलक डॉक्टरांवर केलेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली. सोबतच वरील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती लावून खाजगी डॉक्टरांनी रुग्ण सेवा केली.

बीलामध्ये अनेक जाचक अटींचा समावेश

या संदर्भात इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या माहितीत पुढे असे म्हटले आहे की , राजस्थान राज्य सरकार नुकतेच “राइट टू हेल्थ बील” मंजूर केले आहे. सदरील बील हे अत्यंत जाचक आहे. हे बील खाजगी वैद्यकिय व्यवसाय करणारांसाठी अत्यंत जाचक आहे. सदरील बीलाला मध्ये एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक रुग्णांना वैद्यकीय उपचार पुर्णपणे मोफत देण्याचे सांगितले आहे. परंतु अत्यावश्यक रुग्ण म्हणजे नेमके कोणते रुग्ण याबाबतचे काहीही स्पष्टीकरण अथवा मार्गदर्शक सुचना दिलेल्या नाहीत. सदरील अत्यावश्यक रुग्णावर मोफत उपचार केल्यानंतर त्या रुग्णाचे वैद्यकीय उपचाराचे बील त्या खाजगी व्यावसायिकाला कसे मिळणार या बाबतीत ही स्पष्टीकरण अथवा मार्गदर्शक सुचना करण्यात आलेल्या नाहीत. या राइट टू हेल्थ बील मुळे राजस्थान राज्य सरकारने सरकारी यंत्रणेचा सर्व भार खाजगी वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवला आहे.

आंदोलक डॉक्टरांवरील मारहाणीचा निषेध


आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. तसेच राजस्थान सरकारने या बीला विरुद्ध जयपुर येथे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर केलेल्या अमानुष लाठीचारांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
सदरील बीलाला विरोध करण्यासाठी या जयपुर येथे झालेल्या आंदोलक डॉक्टरांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने अंबाजोगाई येथील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक काळ्या फिती लातून रुग्ण सेवा करणार आहेत. याचा देशभरातील सर्व इंडियन मेडिकल असोशिएशनचे सदस्यांनी देशभरात निषेध नोंदवला आहे असे ही डॉ. नवनाथ घुगे यांनी सांगितले आहे.

जयपुर येथील मोर्चात १ लाख डॉक्टरांचा सहभाग

राजस्थान सरकारने घेतलेल्या राइट टू हेल्थ बील या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जयपुर येथे काढण्यात आलेल्या खाजगी डॉक्टरांच्या मोर्चात सुमारे एक लाख डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. याच महाकाय मोर्चात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर पोलीसांनी लाठीमार केला होता.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker