राष्ट्रीय

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल


रमेश बैस हे झारखंडचे १० वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. भारतीय जनता पक्षाचे सदस्य, त्यांनी १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

कोण आहेत रमेश बैस !

रमेश बैस हे यापुर्वी झारखंडचे राज्यपाल होते. तयापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. रमेश बैस हे सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रपतींनी १३ राज्यपाल बदलले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशातील १३ राज्यपाल बदलुन त्यांच्या जागी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. बदलण्यात आलेले राज्यपाल खालुल प्रमाणे आहेत.

महाराष्ट्र: रमेश बैस, राज्यपाल अरुणाचल प्रदेश: लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल
सिक्कीम : लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल
झारखंड : सीपी राधाकृष्णनन
हिमिचल प्रदेश : शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल
आसम : गुलाबचंद कटारिया, राज्यपाल
आंध्र प्रदेश: निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल
छत्तीसगढ : बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल
मणिपुरी : अनुसुईया उइके, राज्यपाल
नागालॅंड : एल. गणेशन, राज्यपाल
मेघालय : फागू चौहान, राज्यपाल
बिहार : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल,
लढाशं: ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल,

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker