रमजान महिन्यात लोडशेडींग बंद करून अखंड वीज पुरवठा करण्यात यावा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230317_163012-1024x506.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230317_163012-1024x506.jpg)
आ. नमिता अक्षय मुंदडा यांची मागणी
रमजान च्या पवित्र महिन्यात अंबाजोगाई व केज शहरात एक महिनाभर विजेची लोडशेडींग बंद करून योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी वीज मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230303-WA0246.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230303-WA0246.jpg)
या संदर्भात अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना दि. २३ मार्च २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालवधीत सुरु होत आहे. या कालवधीत लहान, थोर, महिला पुरुष उपवास धरतात त्यासाठी सहेरी साठी दरोज रात्री ०३.०० वाजता स्वयंपाक करण्यासाठी उठावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत सध्या मिळणारा विद्युत पुरवठा अतिशय कमी दाबाने मिळत आहे. त्यामुळे वरील कालावधीत उच्चदाबाने वीज पुरवठा करून विजेचा लपंडाव व लोडशेडिंग बंद करून अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी अंबाजोगाई व केज शहरातील मुस्लीम बांधवांनी केली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230317_163028-300x155.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230317_163028-300x155.jpg)
तरी वरील कालावधीत मुस्लीम धर्मीय लहान, थोर, वयोवृद्ध अतिशय कडक उपवास करतात सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे वीज नसल्यास रोजेदारांना गर्मीचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. केज व अंबाजोगाई या शहरासह परिसरात मुस्लीम बांधवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागातील लोडशेडींग बंद करून योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा करणेबाबत त्वरित आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.
सदरील निवेदनाच्या प्रतिलिपयोग्य त्या कार्यवाही व माहितीस्तव मा. कार्यकारी अभियंता, महावितरण, अंबाजोगाई यांना देण्यात आली आहे.