ठळक बातम्या

योगेश केंद्रे यांची युनायटेड किंग्डम येथे निवड

अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे विद्यार्थी योगेश वाल्मिकराव केंद्रे यांची युनायटेड किंगडम येथील ‘फ्यूजीफिल्म डायोसिंथ बायोटेक्नॉलॉजिज’ या कंपनीत सिनियर प्रोडक्शन टेक्नॉलॉजिस्ट या पदावर निवड झाली आहे.

योगेश केंद्रे यांनी प्राथमिक शिक्षण सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथे व पदवीचे शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय येथे घेतले तसेच औरगांबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.एस.सी मायक्रोबायॉलॉजी जून 2009 मध्ये पूर्ण केले. त्यानंतर वोक्हार्ट बायोटेक औरंगाबाद, डॉ. रेड्डीज लॅबोरोटरीज हैद्राबाद, तसेच सिंगापूर येथील लोंझा व रोश या कंपनीत काम केले. आता त्यांची युनायटेड किंगडम येथील फ्यूजीफिल्म डायोसिंथ बायोटेक्नॉलॉजिज या कंपनीत निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल प्रा. पंडीतराव कराड, डॉ. व्ही. एस. हमदे योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई, संजय केंद्रे, विठ्ठलराव नागरगोजे गट विकास अधिकारी, आण्णासाहेब लव्हारे मा.सभापती पं.स.अंबाजोगाई, रामराव नागरगोजे मा. जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना बीड, महादेव फड, रामराव गित्ते माजी सरपंच यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच त्यांच्या विदेश दौऱ्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker