महाराष्ट्र
योगेश्वरी देवी ची सेवा करण्याची पुन्हा २०१६ च्या जुन्या संचालकांना संधी!
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात परिचित असलेल्या अंबाजोगाईच्या ग्रामदेवता आणि कोकणवासीयांची कुलदेवता श्री योगेश्वरी मातेची पुन्हा नवू महीने सेवा करण्याची संधी उच्च न्यायालयाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मंदीराचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी आज या आदेशाचे पालन करीत २०१६ साली निवडुन आलेल्या संचालक मंडाळाकडे विश्वस्त मंडळाचा कार्यभार सोपवला.
अनेक वर्षांपासून सुरू होता वाद
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी मंदीराच्या विश्वस्त मंडळाचा वाद गेली अनेक वर्षांपासून धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरु होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणात अलिकडेच विद्यमान विश्वस्त मंडळाकडुन कारभार काढुनी घेत २०१६ साली नियुक्त करण्यात आलेले विश्वस्त मंडळ या पुढे नवू महीने योगेश्वरी विश्वस्त मंडळाचा कारभार सांभाळेल व या नवू महिन्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाला मार्फत निवड प्रक्रिया पुर्ण करुन नवीन विश्वस्त मंडळ निर्माण करण्यात यावे असे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या निकालाची केली होती दिशाभूल
उच्च न्यायालयाने सदरील आदेश दिल्यानंतर ही विद्यमान सचीव प्रा. अशोक लोमटे यांनी एक पत्रपरिषदेत घेऊन उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची दिशाभूल करीत सदरील निकाल पत्रात आपल्याच विश्वस्त मंडळास पुढील नवू महीन्याच्या कालावधीत आपल्यालाच कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे असे सांगून दिशाभूल केली होती.
२०१६ च्या संचालकांनी केला विरोध
सदरील पत्रकार परिषदेतील प्रा. अशोक लोमटे यांच्या व्यक्तव्याचा २०१६ साली नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाचे सचीव ऍड. शरद लोमटे यांनी तीव्र विरोध करीत विद्यमान सचीव हे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची दिशाभूल करीत असून २०१६ साली नियुक्त करण्यात आलेले विश्वस्त मंडळच यापुढे नवू मीहीने काळजीवाहू विश्वस्त म्हणून काम पाहिल असे सांगत या प्रकरणी विश्वस्त मंडळांचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्याकडे जावून यासंदर्भात अधिकृत काम पाहण्याची परवानगी घेवून असे सांगितले होते.
