महाराष्ट्र
यावर्षी आंतरभारतीचा स्नेहवर्धन पुरस्कार नेपाळचे नरपती कुंजेड यांना


१५ ऑगस्ट रोजी होणार वितरण !
आंतरभारती आंबाजोगाईच्या वतीने दर पंधरा ऑगस्ट रोजी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार या वर्षी नेपाळचे राहणारे नरपती कुंजेडा यांना जाहीर करण्यात आला आहे.नरपती हे नेपाळ मधील जियेगाव फुलवारी येथील राहणारे आहेत. पंचवीस वर्षा पूर्वी मुलाच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथे आले होते. त्यानंतर ते येथेच राहिले. मेडिकल कॉलेज परिसरात ते रात्रीचे वॉचमन म्हणून काम करतात.
नरपती हे नेपाळ मधील जियेगाव फुलवारी येथील राहणारे आहेत. पंचवीस वर्षा पूर्वी मुलाच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथे आले होते. त्यानंतर ते येथेच राहिले. मेडिकल कॉलेज परिसरात ते रात्रीचे वॉचमन म्हणून काम करतात.
१० वा पुरस्कार; दशकपूर्ती समारोह!
अन्य राज्यातून येऊन आंबाजोगाई येथे स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरभारतीच्या वतीने स्नेहसंवर्धन पुरस्कर देऊन सन्मानित केले जाते. आतापर्यंत 9 पुरस्कार दिले गेले आहेत. हे या पुरस्काराचे 10वे वर्ष आहे. दशक पूर्तीच्या निमित्ताने पूर्वीच्या सर्व हयात सत्कारमूर्तींचा सन्मान केला जाणार आहे.

