मुकुंदराज रोड वरील कच-याची घाण तात्काळ उचला; आ. नमिता मुंदडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230128_174816-1024x996.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230128_174816-1024x996.jpg)
मुकुंदराज रोड वरील कच-याची घाण तात्काळ उचलण्याचे आदेश द्यावेत अशी सुचना आ. नमिता मुंदडा यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना केली आहे.
या संदर्भात अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना पाठवलेल्या पत्रात त्या पुढे असे म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरातील भक्तनिवास ते मुकुंदराज रोड, हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे परंतु सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात कचरा, जुन्या घराचे मटेरीयल टाकले आहे. सदर रस्त्यावर योगेश्वरी देवीचे मंदिर, भक्तनिवास सावता माळी मंदिर, दासोपंत मंदिर, रेणुकामाता मंदिर, आद्यकवी मुकुंदराज स्वामी मंदिर तसेच विविध समाजाच्या स्मशानभूमी आहेत. कचरा व घाणीमुळे सदर रस्त्यावरून जाताना भाविकभक्त/नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील घाण, मटेरियल, कचरा उचले अत्यंत आवश्यक आहे.
तरी अंबाजोगाई शहरातील भक्तनिवास ते मुकुंदराज रोड, या रस्त्यावरील घाण, मटेरियल, कचरा, त्वरित उचलण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत. अशी सुचेना आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे.