मानवलोक च्या 41 व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193240-261x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193240-261x300.jpg)
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, आ. नमिता मुंदडा व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
गेली ४१ वर्षांपासून सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या उत्थानासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मानवलोक या सेवाभावी संस्थेच्या वतीने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमातील मुख्य सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिकारी दिपा मुधोळ, आ. नमिता अक्षय मुंदडा या उपस्थित राहणार आहेत तर पद्मश्री मा. शब्बीर भाई शेख, मा. वसुधा ताई सरदार (प्रख्यात सेंद्रिय शेतकरी तथा अभ्यासक), मा. बाबासाहेब जेजुरकर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख हे राहणार आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193303-1024x979.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193303-1024x979.jpg)
मानवलोकच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ११ वाजता मानवलोक मुख्यालय येथे शेतकरी मेळावा सेंद्रिय शेती कृषी उत्पादनाचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर व आजी माजी कार्यकर्ता स्नेह मिलन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मानवलोक परीवाराचे दाते, हितचिंतक, स्नेही, आप्तेष्टांनी ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मानवलोकच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोबतच सेंद्रिय शेती कृषी उत्पादनाचे प्रदर्शनाचे आयोजन मानवलोक मुख्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत तर सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193635-699x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193635-699x1024.jpg)
या सर्व कार्यक्रमास मानवलोक परीवाराचे हितचिंतक, स्नेही व मित्र परीवाराने उपस्थित रहावे असे आवाहन अनिकेत लोहिया, कार्यवाह, मानवलोक अंबाजोगाई यांनी केले आहे.