माध्यम इफेक्ट: सह्या आणि पगारापुरतेच संबंध ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची शोध मोहीम सुरु!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image32181217-1680274951487.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image32181217-1680274951487.jpg)
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञान दान आणि रुग्णसेवा न करताच केवळ सह्या करुन लाखो रुपयांचा प्रतिमहा पगार उचलणा-या वैद्यकीय शिक्षकांच्या संदर्भातील माहिती देणारी बातमी “दैनिक लोकप्रभा” ने ३ एप्रिल च्या अंकातुन प्रसिद्ध होताच या बातमीची शहरातील अनेक मान्यवरांनी दखल घेतली आहे. या संदर्भात अनेकांनी या सह्या आणि पगारापुरतेच संबंध ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची शोध मोहीम सुरु केली आहे. अशा वैद्यकीय शिक्षकांची नावे गोळा करण्याचे काम संपले की या विरुद्ध सामुहिक आवाज उठवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
ज्ञानदान आणि रुग्णसेवा न करताच लाटतातलाखो रुपयांचा पगार
अंबाजोगाई येथे ४८ वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनेक विभागात लाखो रुपयांच्या पगारी देवून शासनाने नियुक्त केलेल्या वैद्यकीय शिक्षकापैकी अनेक वैद्यकीय शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान आणि रुग्ण सेवा करण्याचे काम न करताच महिन्याला फक्त एकदाच येवून सह्या करुन लाखो रुपयांचा पगार उचलून निघून जातात त्यांच्या या बेमुर्वतखोर पणाच्या वागण्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानदान करण्याचे काम जवळपास बंद पडल्यागत झाले आहे तर याचा विपरीत परीणाम रुग्ण सेवेवर ही होवू लागला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय शिक्षकांच्या प्रतिमेला ही ठेच पोहोचवण्याचे काम हे बेमुर्वतखोर वैद्यकीय शिक्षक करीत आहेत.
त्या वैद्यकीय शिक्षकांचा शोध सुरु!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230314_095916.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230314_095916.jpg)
या संबंधीच्या बातमी “माध्यम” ने विस्तृत प्रसिध्दी देताच या वैद्यकीय महाविद्यालयाशी आस्था बाळगून असणारा एक घटक मोठ्या प्रमाणावर पुढे आला असून केवळ सह्या आणि पगारापुरतेच संबंध ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची शोध मोहीम या गटाने सुरू केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या विविध अवयवांचे ज्ञान देण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विभागांची निर्मिती केलेली असते व या प्रत्येक विभागात १ विभाग प्रमुख (प्राध्यापक), किमान ४ सहाय्यक प्राध्यापक, ७ ते ८ लेक्चरर, आंतररुग्ण विभागातील रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी हाऊसमन, डॉक्टर आदि शेकडो वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असते. यापैकी प्रत्येक विभागातील दांडीबहाद्दर वैद्यकीय शिक्षकांचा शोध प्रत्येक विभागात जावून शोध घेण्याचे काम या गटाने सुरू केले आहे. ही माहिती एकत्रित झाली की या सह्या आणि पगारापुरते संबंध ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांविरोधात एक व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230402_120504.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230402_120504.jpg)
माहिती असेल तर नावे कळवा; आवाहन
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे अंबाजोगाईकरांच्या अस्मितेचा विषय आहे, त्याही पेक्षा हे वैद्यकीय महाविद्यालय हे या विभागातील शैक्षणिक अनुशेष दुर करण्यासाठीचा एक मैलाचा दगड ठरलेले महाविद्यालय आहे. तेंव्हा या वैद्यकीय महाविद्यालयातील ज्ञान दानाच्या आणि रुग्णसेवेच्या परंपरेला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या सह्या आणि पगारापुरताच संबंध ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची काही नावे आपणास माहीत असतील तर आपणही मोकळेपणाने या गटात सहभागी व्हावे असे आवाहन या गटाच्या वतीने सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी घेतली दखल
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193303.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_193303.jpg)
“माध्यम” ने २ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची दखल या विभागाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी घेतली असून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक विभागात नियुक्त करण्यात आलेल्या प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लेक्चरर व इतर वैद्यकीय शिक्षकांनी आपल्या ज्ञान दानाच्या व रुग्णसेवेच्या कामात कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा पणा न करता नियमितपणे काम करावे अशा सुचना करीत ज्ञानदान व रुग्णसेवेत अनियमितता आढळून आली तर संबंधित वैद्यकीय शिक्षकांच्या तक्रारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे करण्यात येवून कार्यवाही ची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230405_215245-1024x687.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230405_215245-1024x687.jpg)