महाराष्ट्र
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुक रिंगणातून माघार
बीड जिल्ह्यातील अभ्यासू राजकारणी तथा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आहे.