माजी मंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल; जेल मध्येच पडले होते बेशुद्ध!
ऑगस्ट – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शुक्रवारी तुरुंगात बेशुद्ध पडल्याने त्यांना येथील सरकारी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एका कथित भ्रष्टाचारप्रकरणी येथील आर्थर रोड कारागृहात बंद असलेले देशमुख यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे तुरुंगातील अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्याने छातीत दुखत असल्याच तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा रक्तदाब वाढलेला आढळून आला आणि ईसीजी अहवाल असामान्य असल्याचे त्यांनी नोंदवले. अनिल देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. उल्लेखनीय म्हणजे, देशमुख यांना प्रथम अंमलबजावणी संचालनालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये आणि नंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत.
मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तत्काळ मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांचा रक्तदाब वाढल्याचीही माहिती मिळत आहे. डॉक्टर त्यांच्यावर सध्या उपचार करत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या छातीतही दुखत होतं, अशी माहितीही समोर येतीये. (Anil Deshmukh Admitted in JJ Hospital Mumbai)
सकाळी ११ वाजताची ही घटना आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगातच चक्कर आल्याने ते जागेवर खाली पडले. त्यानंर तेथील तुरुंग अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना पाचारण केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असताना त्यांचा अतिशय उच्च रक्तदाब होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवलं जाईल, असा निर्णय जेल अॅथॉरिटीने घेतल्याची माहिती कळतीये.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या दहा महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत. या दहा महिन्यांत अनिल देशमुख यांची प्रकृती पुरती खंगल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असतानाचा अनिल देशमुख यांची ऐट आणि रुबाब लक्षात घेता सध्याची त्यांची अवस्था निश्चितच धक्कादायक आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती
अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेसाठी त्यांना एप्रिल महिन्यात जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावरील उपचाराबाबत अनिल देशमुखांनी खासगी रुग्णालयात उपाचाराची मागणी केली होती. मात्र, ईडीच्या विरोधानंतर त्यावर निर्णय देत विशेष पीएमएलए न्यायालयाने विनंती फेटाळली होती. त्यानंतर त्यांच्यावर जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
देशमुख यांचा जे जे रुग्णालयातला व्हिडीओ व्हायरल झाला होता
मागील काही महिन्यात सोशल मीडियावर अनिल देशमुख यांचा जे.जे. रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जे.जे. रुग्णालयातील लिफ्टच्या समोरच्या परिसरात हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आला आहे. याठिकाणी अनिल देशमुख पोलिसांच्या गराड्यात व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. तुरुंगात असताना देशमुख यांचे पूर्ण रुप बदललेलं असून त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस पांढरे झालेले दिसत आहे. एकूणच त्यांची प्रकृती जास्तच खंगलेली दिसत होती.