लातूरठळक बातम्या

माजी पालकमंञी अमित देशमुख व जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या प्रयत्नामुळे औसा शहरातील धोकादायक विद्युत डीपी हलविला

लातूर प्रतिनिधी :-
औसा शहरातील लातूर वेस येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला धोकादायक विद्युत डीपी रहदारीसाठी अत्यंत अडथळ्याचा झाल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक येथे ऑटो रिक्षा, व खाजगी ग्रामीण भागातील वाहतूक करणारे वाहने थांबत होते.तसेच मंदिराच्या परिसरात भाजी विक्रेते, फेरीवाले या ठिकाणी व्यवसाय करीत होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा होऊन वाहतुकीची सातत्याने कोंडी होत होती. महावितरणच्या या धोकादायक विद्युत डीपी मुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होत असल्याने या परिसरातील नागरिकांनी,व तत्कालीन नगर सेवक यांनी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या औसा शहरातील जन समस्या,संपर्क अभियानाच्या  वेळी फुलेनगर येथील स्थानीक नागरीक व तत्कालीन नगर सेवकांनी जन संवाद बैठकीत ही लाईट डीपी बाबत लेखी व तोंडी तक्रार केली होती .त्यांची दखल घेत श्रीशैल उटगे यांची दखल विद्युत डीपी ईतर ठिकाणी हलविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती च्या बैटकीत माजी पालकमंञी अमित देशमुख यांच्या कडुन 3 लक्षच्या वर जिल्हा वार्षिक निधीतुन निधी मंजुर करुन घेतली व त्या निधीतुन हे  धोकादायक विद्युत डीपी सुरक्षित रित्या दुसरीकडे हलविन्यात आला. या परिसरातील विद्युत पुरवठा दिवसभर बंद करून मंदिराच्या पाठीमागे असलेला विद्युत डीपी काढून मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस नव्याने विद्युत डीपी बसवून महावितरण विभागाने आता विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये व भाजीपाला विक्रेते, फेरीवाले यांच्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले असून जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचे आभार मानत आहेत.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker