मांजरा नदीकाठच्या गावांमध्ये होणार सहा दिवस नदी संवाद यात्रा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_213526-1024x670.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_213526-1024x670.jpg)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाचा उपक्रम!
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्हयातील नद्यांच्या प्रदुषण, अतिक्रमण आदी धोक्यांपासून बचावासाठी “चला जाणूया नदीला” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील मांजरा व होळणा या तिच्या उपनदीची निवड करण्यात आली आहे. जिल्हयातील मांजरा नदीच्या उगमापासून जिल्ह्यातील नदी काठच्या भागात येणारी गावे व तेथील नागरीकांमध्ये जनजागृतीसाठी 4 जानेवारी 2022 पासून 6 दिवस नदी संवाद यात्रेचे आयोजन केले जाईल. या अंतर्गत नदीचे महत्व जनतेला समजावून देतानाच पुढच्या पिढ्यांसाठी अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_213553-1024x677.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_213553-1024x677.jpg)
जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी अभियानाच्या राज्यसमितीचे सदस्य अनिकेत लोहिया व यशदा संस्थेचे मार्गदर्शक व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे व जैवविविधता अभ्यासक संशोधक डॉ. अमित गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते.