मांजरा धरण आणि नदीवरील बंधा-या तील पाणी पिण्यासाठीच आरक्षित!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1365836168-1692719605484.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1365836168-1692719605484.jpg)
पाटबंधारे विभागाने काढले आदेश!
मराठवाड्यातुन पावसाने काढता पाय घेताच बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील आणि मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले असल्याचे आदेश मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या पाटबंधारे उपविभागीय क्र. १ या कार्यालयाने काढले आहेत.
यावर्षी सुरुवाती पासूनच या विभागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या काळात येणारा पावूस यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात कोसळला. अवेळी पडलेल्या या पावसाने ओले केलेल्या जमिनीवर पुढील काळात पाऊस पडेल अशा आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र सततच्या ताणामुळे या वर्षीचा खरीपाच्या पेरा वाया गेला.
अवैध पाणी उपशावर घातले र्निबध !
यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे केवळ पिकांना ताण दिला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. बीड, लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ ३२ टक्केच पाणी साठा जमा झाला आहे. मागील आठवड्यात ब-यापैकी पडलेल्या पावसाने काढता पाय घेताच मांजरा धरणात आणि मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बांधा-यातील पाणी साठा फक्त पिण्यासाठीच आरक्षित केला असून धरण आणि बंधा-यातील अवैध पाणीसाठा उपशावर आता निर्बंध लावण्यात आले आहेत.
संबंधित विभागांना केले सतर्क
मांजरा धरणातील पाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लातुर येथे कार्यरत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या उपविभाग क्र.१ ने २० सप्टेंबर रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून पाटबंधारे सिंचन शाखा क्र. धनेगाव, पाटोदा, सिंदगाव आणि लातुर शाखांना देण्यात आले आहेत. सदरील आदेश हे बीड, लातुर आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार केले आहेत.
अवैध पाणी उपसा करणा-यावर कारवाईचे निर्देश
या संदर्भीय पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मांजरा धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या केज, कळंब, अंबाजोगाई, रेणापूर तहसील कार्यालयांना मांजरा धरणातील व मांजरा नदीवरील बांधण्यात आलेल्या बांध-यातील पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी पाणी उपसा प्रतिबंधक समिती नियुक्त करुन कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230822_132210.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230822_132210.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1041517250-1692719684786.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1041517250-1692719684786.jpg)