मांजरा धरणावरील २२ पाणी पुरवठा योजनांकडे ४८ कोटींची थकबाकी!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image65866347-17115516871072018940135553119541-300x158.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image65866347-17115516871072018940135553119541-300x158.jpg)
वसुलीसाठी नोटीसा; पाणी बंदची ही कारवाई
मांजरा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या २२ पाणी पुरवठा योजनांकडे सुमारे ४७ कोटी ९२ लाख १८ हजार १६१ रुपयांची पाणीपट्टी थकीत असून या २२ पाणी पुरवठा योजनांना लातुर येथील पाटबंधारे विभागाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातील पाण्यावर बीड, लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच याच धरणातुन लातुर येथील औद्योगिक वसाहत, येडेश्वरी सहकारी साखर कारखाना व इतर औद्योगिक प्रकल्पांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर पाणी देण्यात येते. या पैकी २२ पाणी पुरवठा योजनांनी कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image595823299-17115518151032691252774378713062-279x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image595823299-17115518151032691252774378713062-279x300.jpg)
सध्या मार्च अखेरचे मुहुर्त साधून मांजरा धरणातील पाण्याचा हिशोब ठेवण्यासाठी लातुर येथे कार्यरत असलेल्या जीवन प्राधिकरण मंडळाच्या पाटबंधारे उपविभिग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाने पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे. या धरणावरील पाणी पुरवठा योजनांपैकी थकीत पाणीपुरवठा योजनांची यादी काढून त्यांना ही थकबाकी १५ मार्च पर्यंत जर भरली नाही तर आपला पाणी पुरवठा बंद करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीसा संबंधित योजना प्रमुखांना पाठवण्यात आल्या आहेत.
लातुर येथील पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी फेब्रुवारी २०२४ अखेर पर्यंतच्या २२ थकबाकीदारांची यादी काढून त्यांना थकबाकी भरण्याच्या सुचेना केल्या होत्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206502682729562834394635-1024x679.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206502682729562834394635-1024x679.jpg)
संदर्भही यादी नुसार सर्वाधिक थकबाकी लातुर महानगर पालिका कडे आहे. तर त्या खालोखाल महाराष्ट्र जिवन प्राधिकरण लातुर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लातुर, अंबाजोगाई नगर परिषद, कळंब नगर परिषद, केज-धारुर १२ गावे पाणी पुरवठा योजना यांच्यासह २२ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.
पाटबंधारे विभाग क्र.१ घ्या सहाय्यक अभियंता श्रेणी १ यांनी ४ मार्च २०२४ रोजी कार्यकारी अभियंता लातुर पाटबंधारे विभाग क्र.१ यांना एका विवरण पत्राद्वारे या २२ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टी विषयीची माहिती पाठवली आहे. सदरील माहिती विवरण पत्रात पाणीपट्टी ची मुळ आकारणी, दंडनीय आकारणी, उपकर २०% यांसह एकुण थकबाकीची माहिती दिली आहे. सदरील विवरण पत्रानुसार या २२ योजनांकडे ४७ कोटी ९२ लाख १८ हजार १६१ रुपयांची थकबाकी दाखवण्यात आली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image1103484415-17115517466073009137388256171088-300x285.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image1103484415-17115517466073009137388256171088-300x285.jpg)
या विवरण पत्रात दाखवण्यात आलेल्या माहिती प्रमाणे खालील प्रमाणे थकबाकी आहे. महानगर पालीका लातूर (पाणी पुरवठा योजना) २५९३७०४४७ (थकबाकी रक्कम), म.जि.प्रा.लातूर २८३१९३६७, नगरपरिषद आंबाजोगाई५१४०४६६६,
नगर परिषद कळंब १६६०५६९, केज धारुर १२ गावे पा.पु. ४२३४९९३, म.औ.वि.म. लातूर १३१३७१९३७, ग्रा.प.पुर्व लोहटा ९३८९९२, ग्रा.प. भालगाव ४८४२१, ग्रा.प.युसूफ वडगाव २६५४९२, ग्रा.प. माळेगाव, ४४३९१, ग्रा.प. धनेगाव ११०१९३
ग्रा.प. आवाड शिरपुरा १२२२५८, ग्रा.प. शिराढोण ४४२९५९, ग्रा.प. मुरूड २५०५१८, येडेश्वरी शुगर सारणी १११७७, ग्रा.प. साळेगाव ११८६२०, ग्रा.प. करंजकल्ला १३३७५३, ग्रा.प. दाभा ४५८०८, ग्रा.प. हिंगनगाव, ५३०६३, चिंचोलीमाळी १५ गावे २७०५३७ या एकूण २२ पाणी पुरवठा योजनाकडे ४७,९२,१८,१६१ एवढी रक्कम थकबाकी आहे.