मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली; २४ तासात ५.७१ दलघमी पाणीसाठ्यात वाढ
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/मांजरा-धरण.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/मांजरा-धरण.png)
अंबाजोगाई / मांजरा प्रकल्प क्षेत्रात गेल्या २४ तासात ५० मिमी पाऊस झाला असून या कालावधीत ५.७१ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. दरवर्षी परतीच्या पावसात धरणात पाणी साठा वाढत असे. यंदा मात्र प्रारंभीच्या पावसातच पाणी साठ्यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. २७% वरून ३१ टक्क्यांवर पाणीसाठा गेल्याने दिलासा मिळाला असून तासाला ०.२० दलघमी पाण्याची आवक धरणात होत आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तासाला ०.२० दलघमी पाण्याची आवक आहे. सध्या प्रकल्प पाणी पातळी ६३८.६२ मीटर आहे तर प्रकल्पात पाणीसाठा १०२.७९३ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ५५.६६३ दलघमी आहे. तर जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ३१.४५% आहे. जून पासून १४ जुलै पर्यंत म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात ८.३७ दलघमी नवीन पाणी प्रकल्पात आले आहे.
मांजरा धरण तुडुंब भरल्यानं सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ‘ओव्हर-फ्लो’ झालाय. दोन दिवसांपासुन लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे सहा दरवाजे 2 मीटरने उचलण्यात आले असून धरणातून 35967.99 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात रात्रभर दमदार पाऊस झाल्यानं नदी दुथडी भरून वाहत आहे. मांजरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.