मांजरा धरणातील पाणी पुरवठा बंद करण्याची अंबाजोगाई न. प. ला नोटीस
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1207194296724923150655430-1024x478.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1207194296724923150655430-1024x478.jpg)
५ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी
शहर पाणीपुरवठ्यासाठी धनेगाव येथील मांजरा धरणातुन घेण्यात येणा-या पाण्याची आज पर्यंतची५ कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी १५ मार्च पर्यंत भरा अन्यथा आपला पाणी पुरवठा बंद करण्यात येईल अशी नोटीस जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना बजावली आहे.
मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या लातुर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता, लातुर पाटबंधारे विभाग यांनी ७ मार्च रोजी कार्यालयीध पत्र जा. क्र. सिंचन शाखा ६५६ अन्वये अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना दिलेल्या नैटीसीत पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, नगर परिषद पाणी पुरवठा योजना अंबाजोगाई यांना मांजरा प्रकल्प. धनेगाव जलाशयातुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सदर योजनेकडे माहे १/२००३ अखेर थकीत पाणीपट्टी ५००.७१ लक्ष रु. (पाच कोटी ७१ लक्ष रुपये) आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206083420506781061360678-647x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206083420506781061360678-647x1024.jpg)
सदर आर्थिक वर्षामध्ये प्राधिकरण कार्यालयाकडुन बिगर सिंचन पाणी पट्टी वसुलीचे उदीष्ट साध्य करणे बाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत असुन त्या अन्वये आपणाकडे असलेली थकीत रक्कम ५००.७१ लक्ष रु. दि. १५ मार्च २०२४ पर्यंत भरणा करुन सहकार्य करणे अभिप्रेत आहे.
तेंव्हा या पत्रान्वये आपणास सुचीत करण्यात येते की, दि.१५ मार्च २०२४ पर्यंत आपणाकडे असलेली पाणीपटी ५००.७१ लक्ष रु. भरणा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील भाग -६ प्रकरण १ कलम ४८ (ज) अन्वये पाणी पुरवठा खंडीत करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206507167638898748689553-1024x679.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206507167638898748689553-1024x679.jpg)
सदरील पत्रावर कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र.१ लातूर यांची स्वाक्षरी असून
या पत्राच्या प्रती अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206254986477002220651528-598x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240327_1206254986477002220651528-598x1024.jpg)